हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या राज्यात सर्वत्रच तापमान चांगलेच कमी झाले आहे. शेतातील पिकांवर दव पडत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज आपण कापूस, मका, रब्बी ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, गहू आदी पिकांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. पुढील ३ दिवसात तापमानात बदल होणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झाली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. तेव्हा आम्ही खाली काही गोष्टी सांगणार असून यामुळे शेतकऱ्यांना पिकांचं नुकसान टाळणं शक्य होणार आहे.
हे तंत्रज्ञान वापरून वाढवा शेतीमधील उत्पन्न
शेतकरी मित्रांनो आता नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतीमधील आपलं उत्पादन वाढवण्याची गरज आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. इथे कृषी विद्यापीठांकडून दिला जाणारा कृषी सल्ला, रोजचा हवामान अंदाज, शेतीशी निगडीत सर्व घडामोडी आदींची माहिती आपल्याला मिळते. शिवाय आपल्या शेतजमिनीचा ७/१२, नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. रोजचा बाजारभावही स्वतःला चेक करता येतो. जमिनीची मोजणीही करता येते अन शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही करता येते. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करून या तंत्रज्ञानाचा लाभ घ्या.
मराठवाडयात दिनांक 20 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीती ओलावा किंचित कमी झालेला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
शेतकरी मित्रांनो अशी घ्या तुमच्या पिकांची काळजी
कापूस
- कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये.
- कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
तूर
- काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
मका
- उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
- फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

रब्बी ज्वारी
- रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे.
- उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
- फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
रब्बी सूर्यफूल
- वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी सूर्यफुल पिकाची काढणी करून घ्यावी.
गहू
- गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे.
- गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भुईमूग
- वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.
- उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी 8 फेब्रुवारी पर्यंत करता येते.