Income Tax On Farmers : शेतकऱ्यांवर कर लावला जातो का? काय सांगतो कायदा? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Income Tax On Farmers : आपल्याकडे अनेकजण शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती करता असताना शेतकरी फक्त दिवसरात्र कष्ट करत असतात मात्र तुम्हाला काही नियमांची माहिती असणे देखील खूप गरजेचे आहे. शेतकर्‍यांवर कर लावण्याचे काय नियम आहेत हे अनेकांना माहीत नाही. शेतकऱ्यांना कर लावला जातो की नाही? हे देखील अनेक शेतकऱ्यांना माहित नाही. चलातर मग जाणून घेऊया शेतकऱ्यांवर कर कधी लावला जातो आणि काय नियम आहेत.

शेतकऱ्यांवर नाही लावला जात कर

शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर लावला जात नाही. प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 10(1) अंतर्गत, शेतीतून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. आपला भारत देश हा नेहमीच कृषीप्रधान देश राहिला आहे. बहुतांश लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. त्याचबरोबर खाण्यापिण्याचा पुरवठा सुरळीत ठेवता यावा यासाठी संपूर्ण देश शेतकऱ्यांवर अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांवर कोणताही कर लादला जात नाही, उलट त्यांना सर्व प्रकारच्या योजनांतून दिलासा दिला जातो. बऱ्याचदा शेतकऱ्यांना शेतीमध्ये तोटा सहन करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती, अस्मानी संकट त्याचबरोबर महापूर यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठे नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. म्हणून शेतकऱ्यांकडून कोणताच कर आकारला जात नाही. आतापर्यंत शेतीतून मिळणारे उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आले आहे.

कृषी उत्पन्नावर कर कधी आकारला जातो?

जर कृषी उत्पादनापासून प्रक्रिया केलेले अन्न तयार केले जात असेल, तर त्यापासून मिळणारे उत्पन्न हे कृषी उत्पन्न मानले जाणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या ऊस उत्पादक शेतकऱ्याने आपला ऊस थेट विकला तर ते शेतीचे उत्पन्न असेल, पण जर त्याने गूळ किंवा साखर बनवून विकली तर ते यापुढे शेतीचे उत्पन्न राहणार नाही. झाडांची व्यावसायिक विक्रीही कृषी उत्पन्नाच्या कक्षेबाहेर आहे. जर शेतकऱ्याने असे व्यवसाय केले तर त्या शेतकऱ्यांकडून कर आकारला जातो. त्यामुळे तुम्ही जर असा कोणता व्यवसाय करत असाल तर तुमच्याकडून देखील कर आकारला जाईल

error: Content is protected !!