Kanda Anudan : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘या’ तारखेच्या आत मिळणार अनुदान…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kanda Anudan : पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची चिंता मिटवणारी बातमी आली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांनी पावसाळी अधिवेशनात आज माहिती दिली. राज्य शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारं अनुदान हे १५ ऑगस्टपूर्वी देण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी ३५० रुपये मदत

राज्यातील कांदा उत्पादन शेतकरी अवकाळी पाऊस आणि कांद्याला दर नसल्याने संकंटात सापडला होता.राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेत अनुदानाची घोषणा करण्यात आली होती. तर हे अनुदान 350 रुपये प्रतिक्विंटनुसार करण्यात आलं होतं. मात्र ते ही शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं ते कधी मिळणार अशी विचारणा कांदा उत्पादन शेतकऱ्यांककडून होत होती.

कांदा अनुदान प्रश्नावर विरोधक आक्रमक

सतेज पाटील, भाई जगताप, अंबादास दानवे शेतकऱ्यांना कांद्याचं अनुदान मिळालंच पाहिजे यासाठी आक्रमक झाले. तसंच गेल्या वर्षी कबूल केलेलं अनुदान मिळालं नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला. नाफेडमधून कांदा खरेदी केली जावी यासाठीही विरोधक आक्रमक झाले. तसंच अनुदान कधी मिळणार त्याची नक्की तारीख जाहीर का केली जात नाही असा प्रश्नही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. (Kanda Anudan)

तीन लाख कांदा उत्पादक शेतकरी अनुदानासाठी पात्र

तीन लाख शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना साडेपाचशे कोटींहू अधिक रक्कम अनुदान म्हणून दिली जाईल. कांद्याला ३५० रुपये प्रतिक क्विंटल आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असंही सरकारडून सांगण्यात आलं आहे.

कांदा खरेदी करताना नाफेडचे नियम काय आहेत?

नाफेडकडून कांदा खरेदी केली जाते, सरकार त्यावर अनुदानही देणार आहे. या कांदा खरेदीबाबत काह नियम आहेत. कांदा ४५ ते ५५ मिमी आकाराचा असावा, कांद्याचा रंग उडालेला नसावा, कांदा लाल रंगाचा असावा आणि त्याला विळा लागलेला नसावा.आकार बिघडलेला, कोंब फुटलेला कांदा नसावा असे नियम नाफेडने लावले आहेत.त्यावरुनची विधान परिषदेत चर्चा झाली.

error: Content is protected !!