Pik Vima : सध्या महाराष्ट्रात 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी अधिसूचना काढून मिड सीजन चा पीकविमा लागू करू शकतात असे बोलले जात आहे. अशा वेळी अधिसूचना काढलेल्या महसूल मंडळात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची पूर्व सूचना देण्याची गरज नाही. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी वैयक्तिक पीक नुकसानीची पूर्व सूचना देऊ नये कारण ती ग्राह्य धरण्यात येत नाही. फक्त जिल्हाधिकऱ्यांमार्फतच अधिसूचना द्वारे मध्य हंगाम ( mid season) चा पीकविमा लागू होतो.
या साठी कृषी विभाग पावसाचा खंड पडलेली महसूल मंडळे जिल्हा अधिकारी यांच्या लक्षात आणून देऊन त्यांना आधी सूचना काढण्याची विनंती करू शकतात. आता गरज आहे ती राजकीय इच्छा शक्तीची. जिल्यातील सत्तेतील नेत्यांनी आता जिल्हाधिकारी यांच्या सोबत मीटिंग घेऊन सत्य परिस्तिथी नुसार अधी सूचना काढण्याची विनंती करावी ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळात 21 दिवसा पेक्षा जास्त दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. यासाठी स्थानिक पेपर च्या बातम्या तसेच करपलेल्या पिकांचे फोटो पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात.
अधि सूचना जाहीर झाल्यानंतर जरी पाऊस पडला तरीपण पीक विमा ग्राह्य धरण्यात येतो, कारण तितक्या दिवसांच्या खंड मुळे नुकसान झालेलेच असते. तसेच उत्पादनात घट ग्राह्य धरण्यात येते. त्यांनतर काढणीच्या अवस्थेत अतिवृष्टी मुळे परत नुकसान झाल्यास शेतकरी पुन्हा 72 तासांच्या आत पीक नुकसानीची पूर्व सूचना देऊ शकतात व पंचनामा नंतर पीकविमा मिळतो .
सोयाबीन, कापूस, तुर,मग, उडीद या सर्व पिकासाठी आधि सूचना काढावी या साठी शेतकऱ्यांनी आता सत्ताधारी आमदारांना आग्रह धरला पाहिजे. कमी पावसाची तुट इतकी जास्त आहे त्यामुळे आता जरी पाऊस आला तरी ती भरुन निघणार नाही. तेव्हा याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे.