Koyana Dam : कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात 5 TMC वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Koyana Dam Water Update : राज्यात मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज राज्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामध्ये सातारा, पुणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. साताऱ्यात (Satara News) सतत संततधार पाऊस सुरु असून कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासात साडे ५ टीएमसीने वाढ झाल्याची माहिती आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 5 TMC वाढ

कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असून मागील २४ तासात तब्बल ५ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. ताज्या माहितीनुसार कोयना धरणातील पाणीसाठी 61.30 TMC वर पोहोचला असून एकूण क्षमतेच्या 58.24% धरण भरले आहे. यामध्ये कोयनेत 149, नवजा येथे 215 तर महाबळेश्वर ला 163 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.

फोटो – वैभव देशमुख

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. ताज्या माहितीनुसार सध्या 1050 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर कदाचित अजून पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरण पाणीसाध्याच्या आकडेवारी पहा

Koyna Dam
Date: 26/07/2023
Time: 08:00 AM
Water level: 2120′ 01″ (646.201m)

Dam Storage:
Gross: 61.30 TMC (58.24%)

Inflow: 57,009 cusecs

Discharges
KDPH: 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River: 1050 Cusecs

Rainfall in mm: (Daily/Cumulative)
Koyna: 149/2340
Navaja: 215/3274
Mahabaleshwar: 163/3103

error: Content is protected !!