कृषी सल्ला : महाराष्ट्रात अवकाळीचा धिंगाणा! शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी दिली अतिशय महत्वाची सूचना; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात सध्या अवकाळीने धिंगाणा घातला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्याला नको नको करून सोडले आहे. आता १३ एप्रिल पासून १८ एप्रिल पर्यंतदेखील महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची सूचना केली आहे. हॅलो कृषी नियमितपणे हवामान आधारित कृषी सल्लाबाबत माहिती शेतकऱ्यांना देत असते. तसेच हॅलो कृषी अँपच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांनी आपली प्रगती करून घेतली आहे. खाली आम्ही उर्वरित एप्रिलसाठीचा कृषी सल्ला दिला आहे.

कृषी तज्ञांसोबत फोनवर बोलण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या मालाची (गहू, करडई, रब्बी ज्वारी व मका) सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी न केलेल्या हळद पिकाची काढणी पुढे ढकलावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या चिकू, संत्रा/मोसंबी व द्राक्ष फळांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक (गोदामात) करावी. वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्यास फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्यास प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत.

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने आधार द्यावा.

पशुधन व्यवस्थापन

तुरळकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे चेतावनीच काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.

तुती रेशीम उद्योग

केंद्रिय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हैसूर यांच्या शिफारसीनूसार रेशीम कीटक संगोपन आराखडा अद्यावत असणे आवश्यक आहे. मनरेगा किंवा नानासाहेब देशमुख कृषि संजिवनी (पोक्रा) योजना घेतलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे संगोपन गृह आराखडा 50X20 फुट लांबी रूंदीचा म्हणजे 1000 चौ.फुट क्षेत्रफळ असलेला बनवला आहे. एक एकर तुती लागवड केलेल्या शेतकऱ्याला दुसऱ्या वर्षापासून वर्षाला 5 ते 6 कोषाची पीके काढता येतात म्हणजे एक वेळा 250 ते 300 अंडिपुज तो शेतकरी घेऊ शकतो. पण त्याला अडचण अशी येते की, योजनेत घेतलेले शेडनेट संगोपन गृह 1000 चौ.फुटच क्षेत्र लागते त्यातच 250 ते 300 अंडिपुज तो शेतकरी घेतो आणि रेशीम किटकास दाटी झाल्यामूळे ग्रासरी, फ्लॅचरी रोग प्रादूर्भाव होतो. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासुन पुढे आपल्या शेडनेट संगोपन गृहाचा आराखडा दुप्पट म्हणजे 100X23X15 फुट लांबी, रुंदी व उंची याप्रमाणे करावा व तुती लागवड क्षेत्र 1.5 एकर कमीत कमी असावे, म्हणजे एक वेळेस 400 ते 500 अंडिपुजाचे 5 ते 6 कोषाची पीके घेता येतील.

कुक्कुट पालन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

error: Content is protected !!