कृषी सल्ला : वादळी वारे, पाऊस सुरु असताना शेतकर्‍यांनी काय काळजी घ्यावी? आजच शेतात करा या गोष्टी..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : राज्यात वादळी वारे व पाऊस यामुळे हवामानात मोठा बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. एप्रिल महिण्यात अनेक दिवस असेच हवामन राहील असं हवामान विभागाने सांगितले आहे. वीजांचा गडगडाट, वादळी वारे व पाऊस सुरु असताना शेतकर्‍यांनी आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायला हवी याबाबत आपण आज माहोती जाणुन घेणार आहोत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

बाजारभाव पाहण्यासाठी येथील क्लिक करून App डाउनलोड करा

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या गहू,करडई,रब्बी ज्वारी,मका पिकाची लवकरात लवकर मळणी करून घ्यावी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी न केलेल्या हळद पिकाची काढणी पुढे ढकलावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. हळदीची उघडयावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या चिकू, संत्रा/मोसंबी व द्राक्ष फळांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे नविन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे नविन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची, टरबूज, खरबूज पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने आधार द्यावा.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

कुक्कुट पालन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

error: Content is protected !!