कृषी सल्ला : तापमानात वाढ होत असताना पीक व्यवस्थापन कसं करावं? फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर आजच करा ‘या’ गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून तापमानात वाढ होताना दिसून येते. हवामानात होणारा हा बदल पिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. तापमानात वाढ होत असताना व्यवस्थित पीक व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर शेतकऱ्यांनी अशा वेळी काय काळजी घ्यावी याबाबत आम्ही आज तुम्हाला सविस्तर कृषी सल्ला देणार आहोत. योग्य वेळी योग्य ती खबरदारी घेतली तर शेतीमधील संभाव्य नुकसान टाळून फायदेशीर शेती नक्की करता येते.

पुढील १५ दिवस कसे असेल हवामान?

दिनांक 17 ते 23 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे तर दिनांक 24 फेब्रूवारी ते 02 मार्च 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

हे तंत्रज्ञान वापरून हायटेक शेतीतून शेतीमधील उत्पन्न करा दुप्पट

शेतकरी मित्रांनो आता शेतीमधील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे खूप गरजेचे आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप वापरून १ लाख शेतकरी सध्या हायटेक शेती करून अधिक नफा कमवत आहेत. तुम्हीही या शेती उपयोगी मोबाईल अँप च्या मदतीने प्रगतशील शेतकरी बनून शेतीला व्यावसायिक दृष्टीकोन देऊन मोठा नफा कमावू शकता. आजच तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला रोज कृषी तज्ज्ञांचा मोफत सल्ला मिळतो. तसेच तुमच्या जवळील सर्व खात दुकानदारांशी तुम्ही या अँपच्या मदतीने संपर्क करून खाते Online मागवू शकता. शिवाय तुमचा शेतमाल अँपवर विक्रीसाठी पोस्ट करून थेट बांधावर शेतमालाची विक्री करू शकता. यासोबत रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज इथे दिला जातो. तेव्हा आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचा लाभ घ्या.

हरभरा पीक –

  • कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
  • पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
  • उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.
  • हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी.

करडई पीक व्यवस्थापन –

  • कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
  • करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद व्यवस्थापन –

  • हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.
  • हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी.
  • कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.

ऊस व्यवस्थापन –

  • कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
  • ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी तीळ व्यवस्थापन –

  • कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.
  • कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे मृग बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
  • मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी.
  • रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.
  • आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी.
  • डाळींब बागेत अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी व बागेस हलके पाणी देऊन (अंबवणी करणे) शिफारसीत खतमात्रा द्यावी.
  • काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तुती बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

error: Content is protected !!