हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात थंडीचे प्रमाणात अधिक आहे. अशामध्ये वातावरणातील बदलांमुळे शेतीमधील पिकांवर, बागांवर कीडरोगीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण वेळीच योग्य ती खबरदारी घेतली तर आपल्याला शेतीमधील नुकसान टाळता येऊ शकते. आज आपण फळबाग, भाजीपाला, फुलशेती, तुती रेशीम उद्योग यांची काळजी कशी घ्यायला हवी याबाबत तज्ञांकडून माहिती जाणून घेणार आहोत.
हायटेक शेती करायची असेल तर हे सोप्प काम आजच करा
शेतकरी मित्रांनो आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण शेतीमध्येही त्याचा वापर करून उत्पादन वाढवणे गरजचे आहे. हायटेक शेती करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे अँप आजच तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. इथे नियमित कृषी सल्ला देण्यात येतो. त्यासोबतच शेतकरी स्वतः रोजचा बाजारभाव चेक करू शकतात. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा आदी कागदपत्र सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करण्याची सुविधाही Hello Krushi अँपवर देण्यात आली आहे. आजच हे अँप वापरायला सुरवात करा.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे मृग बहार संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृग बहार डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी.
भाजीपाला
कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती
कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून छाटणी नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20 टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.
सामुदायिक विज्ञान
बालसंगोपन हे अतिशय आव्हानात्मक कार्य आहे. त्यामूळे नवविवाहीत दाम्पत्यांनी पूर्व तयारीनिशी पालकत्वाची जबाबदार स्कारावी. अशी तयारी करत असतांना ते शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे. तसेच त्यांना बाल संगोपनाविषयी शास्त्रोक्त माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी