Land Records : वारस नोंद करणे झाले एकदम सोपे; Online अर्ज कसा करायचा जाणुन घ्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Land Records) : शेतजमीन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या माणसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचा अधिकार मिळतो. परंतु त्यासाठी त्या वारसांचे नाव नोंदणी होणे आवश्यक आहे. यासाठी आता तलाठी कार्यालयात येरझाऱ्या मारायची आवश्यकता नाही. आता आपण Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल App चा वापर करून वारस नोंदी करू शकतो. हा अर्ज कसा करायचा? त्याची नेमकी रूपरेषा काय आहे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र सरकारचा वारसा नोंदीसाठी विशेष उपक्रम

ई – हक्क प्रणाली माध्यमातून शेतकरी 7 ते 8 अर्ज करू शकतात. यात सातबारा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, वारस नोंद करणे, ई – करार करणे इत्यादी सेवांसाठी अर्ज करता येतो. परंतु जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याची माहिती आम्ही खाली सविस्तर दिली आहे. वारस नोंद करणे आता अगदी सोपे झाले असून दोन मिनिटांत नोंद चढवणे शक्य झाले आहे. यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करुन App डाऊनलोड करुन घेणे गरजेचे आहे.

१) सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन तिथे Hello Krushi असं सर्च करा. यानंतर हिरव्या रंगाचा लोगो असलेले हॅलो कृषीचे app इन्स्टाॅल करुन घ्या.

२) आता Hello Krushi app ओपन करा. होम पेजवर तुम्हाला सरकारी योजना नावाचा विभाग दिसेल तो निवडा.

३) सरकारी योजना या विभागात तुम्हाला शासनाच्या अनेक योजना दिसतील. तुम्ही स्क्रिनवर बोट ठेऊन ते खाली स्क्रोल करु वारस नोंद अर्ज करणे यावर क्लिक करा.

४) आता तुम्हाला वारस नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत माहिती दिसेल. तसेच शेवटी Apply Now असे बटन दिसेल.

५) Apply Now वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठीचा डेशबोर्ड ओपन होईल.

  • त्यानंतर Proceed To log in करायचं. त्यावेळी तुम्हाला तुमचं अकाउंट सुरू करायचं. त्यासाठी आधी Create New User यावर क्लिक करा.
  • नंतर New User Sign Up नावाने पेज उघडेल. त्यानंतर संपूर्ण नाव टाकायचं, त्यानंतर लॉग इन डिटेल्समध्ये जाऊन check Availability पर्यायावर जाऊन क्लिक करा.
  • Password टाकून पुन्हा एकदा तोच password टाकावा. तसेच security Question मध्ये जाऊन पुन्हा एकदा उत्तर द्यायचं आहे.
  • मोबाईल नंबर, पिन कोड, ई – मेल, पिन कोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल.
  • Select city मध्ये आपलं गाव निवडावं
  • घरावर जर नाव असेल तसेच आपण ज्या विभागात राहतो त्या विभागाचे नाव नमूद करावे. Land Records
  • सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथं असणारे आकडे किंवा अक्षरं जशीच्या तशी पुढच्या कप्प्यात लिहायची आहे, आणि मग सेव्ह बटन दाबायचं आहे.
  • या पेजखाली Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction. असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल.
  • पुन्हा एकदा Back या बटणावर क्लिक करून पुन्हा लॉग इन करायचं.
  • टाकलेला युझरनेम कोड टाकून कॅप्चा टाकावा. लॉग इन करायचं. त्यानंतर Details नावाचं एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथे तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे. सामान्य नागरिक असाल तर User is Citizen आणि बँकेचे कर्मचारी असाल तर User is Bank या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • एकदा युझरचा प्रकार निवडला की त्यानंतर process या पर्यायावर क्लिक करा. फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क नावाचे पेज ओपन होईल.
  • या ठिकाणी जिल्हा, तालुका, गाव निवडायचं. जो फेरफार निवडायचा आहे, तो फेरफार प्रकार निवडा. असा मेसेज तुम्हाला येईल. वारस नोंद करायची असल्याने वारस नोंद पर्याय निवडा.
  • त्यानंतर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. इथे तुम्हाला सुरुवातीला अर्जदाराची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, वडील किंवा पतीचं नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर मयताचे नाव आणि खाते क्रमांक टाका. त्यानंतर खातेदाराचे नाव टाकने अपेक्षित आहे. त्यानंतर मयतदाराचे नाव शोधावे. एकदा ते नाव निवडलं की संबंधित खातेदाराच्या नावे असलेला गट क्रमांक निवडायचा आहे. नंतर मृत्यू दिनांक टाकायचा आहे.
  • अर्जदार वारसांपैकी अहेबका? असा प्रश्न विचारला जाईल. तेव्हा हो अथवा नाही असा पर्याय निवडा. जर वारस असेल तर पर्याय निवडून माहिती भरा. नाव, वडील किंवा पतीचं नाव, आडनाव लिहायचं आहे.
  • पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथे आपोआप येईल.
  • पोस्ट ऑफिस, तालुका, गाव निवडावे. पुढे मयाताशी असलेले नातं निवडावं. मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, नातू, नात, सून – जे नातं असेल ते निवडायचं आहे. यापैकी नाते नसल्यास सगळ्यात शेवटच्या यापैकी नसल्यास या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • पुढील वारस या पर्यायावर क्लिक करायचं आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसासंदर्भात भरायची आहे आणि साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. अशा रितीनं सगळ्या वारसांची नावे भरून झाली की पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि कागदपत्रे जोडायची आहे.
  • मृत्यू व्यक्तीचा मृत्यू दाखल जोडण्यासाठी ग्रामपंचायतीतीन मिळालेला मृत्यूचा दाखला याची सत्यप्रत जोडावी. तसेच एका कागदावर शपथपत्र जोडून त्याखाली इतर वारसांची नावे आणि पत्ता नमूद करावा.
  • त्यानंतर फाईल अपलोड झाली असा आवाज येईल किंवा मेसेज येईल.
  • त्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणपत्र दिसेल. Land Record
  • अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब लपवुन ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही, असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177 , 193 , 197 , 198 , 199 आणि 200 अन्वये दंडात्मक / कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत. – अशा आशयाचं हे पत्र असतं.
  • यानंतर पत्राच्या खाली सहमत आहे या बटणावर क्लिक करून वारस नोंदीसाठी आपला अर्ज तलाठी कार्यालयात सबमिट करावा. त्यानंतर अर्जाची छाननी करून सातबाऱ्यावर नाव चढवले जाते.
error: Content is protected !!