Lemon Rate : लिंबाची शेती करणारे शेतकरी मालामाल! ‘या’ ठिकाणी मिळाले सर्वाधिक दर, आजचे बाजारभाव काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Lemon Rate) | उन्हाळा ऋतू असल्याने नागरिक शीत पेयांकडे धाव घेतात. थंड पेयांसाठी लिंबाची आवश्यकता असते. ज्यूस सेंटर किंवा लिंबू सरबत स्टॉलवर अधिकाधिक लिंबाची मागणी असते. त्यामुळे आता लिंबाच्या वाढत्या दराने शीत पेयांचे दर आपोआप वाढले आहेत. काही ठिकाणी लिंबू ६० ते ६५ रुपये किलोने विकले जात आहेत. तर काही ठिकाणी ८० रुपयांनी विकली जातात. यामुळे आता शेतकरी मालामाल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. मात्र हे नुकसान लिंबाचे दर भरून काढतील यात कोणतीही शंका नाही. याचा अधिक फायदा हा आता लिंबाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना होतोय. या लिंबाच्या दरात घट न होता आजच्या बाजारभावात वाढ होताना दिसतेय. ही वाढ मे महिन्यांपर्यंत राहील असे उत्पादक म्हणत आहेत. अशाचप्रकारे आजच्या बाजारभावात कालच्या दरापेक्षा वाढ होताना दिसतेय.

राज्यात पुण्यामध्ये लिंबला प्रतिक्विंटल २८८ असा बाजारभाव मिळाला आहे. तसेच पुणे – मोशी येथे प्रतिक्विंटल २३ असा बाजारभाव पहायला मिळत आहे. तसेच इतर ठिकाणी लिंबाला प्रतिक्विंटल किती बाजारभाव आहे हे खालील तक्त्यात दिले आहे.

बाजारभाव पाहण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? Lemon Rate

शेतकरी मित्रांनो गुगल प्ले स्टारवरील Hello Krushi हे मोबाईल अँप अजूनपर्यंत तुम्ही डाउनलोड केलेले नसेल तर आत्ताच सर्वात अगोदर ते करून घ्या. कारण इथे तुम्हाला महाराष्ट्रातील पाहिजे त्या बाजारसमितीमधील रोजचे ताजे बाजारभाव पाहण्याची सुविधा आहे. तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज आदी सेवाही येथे उपलब्ध आहेत.

बाजारभाव शेतमाल : लिंबू (Lemon Rate Today)

शेतमाल : लिंबू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/04/2023
राहताक्विंटल49000100009500
उस्मानाबादकागदीक्विंटल104700120008350
पुणेलोकलक्विंटल288100060003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल236000120009000
भुसावळलोकलक्विंटल7800080008000
error: Content is protected !!