‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 1500 कोटी रुपये; मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार असल्याबाबत घोषणा करण्यात आली. तसेच यावेळी १५०० कोटीस रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. लवकरच सदर शेतकऱ्यांना १५००० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

यासोबतच कंत्राट ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता सुधारित मानधनानुसार कंत्राटी ग्रामसेवकास १६ हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे. यामुळे राज्यातील कंत्राटी ग्रामसेवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तसेच पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे आता या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार असून आर्थिक अर्थसहायय मिळणार आहे.

मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :

✅ सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता

✅ कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये

✅ अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.

✅ पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ

✅ लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार

✅ पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार

✅ अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ

✅ मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना

✅ स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ

✅ चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार

error: Content is protected !!