Maize Production : ICAR ने जारी केल्या मक्याच्या ‘या’ 2 नवीन जाती; काय आहेत वैशिष्टये? शेतकऱ्यांनी निवड करावी का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । ICAR ने देशातील पहिल्या प्रोव्हिटामिन-ए समृद्ध मक्याचे (Maize Production) दोन नवीन वाण प्रसिद्ध केले आहेत. बायोफोर्टिफाइड मक्याच्या या नवीन जातींना ‘पुसा विवेक QPM 9 Unnat’ आणि ‘Pusa HQPM 5 Unnat’ असे नाव देण्यात आले आहे. बायोफोर्टिफाइड प्रोविटामिन-ए मक्याचे हे नवीन वाण मक्याच्या सामान्य वाणांपेक्षा अतिशय फायदेशीर आहेत.

शेतकऱ्यांनी या नव्या वाणांची निवड करावी का?

काही क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर या वाणांची शेतकऱ्यांनी लागवड करण्यास हरकत नाही. या नवीन वाणात पौष्टीक गुणधर्म अधिक असल्याने याला मागणी वाढत आहे. मात्र कोणत्या भागात हे वाण कसे येतायत याचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी या वाणांची निवड करावी. म्हणून पहिल्या टप्प्यात ठराविक क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर या वाणांची निवड करून त्याचा अंदाज घेऊन मगच पुढील विचार करायला हवा.

हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. यासोबत तुम्हाला इलेक्ट्रिक बैल प्रमाणे इतर कोणतीही शेती उपयोगी उपकरणे अतिशय कमी किंमतीत विकत घ्यायचे असतील तर Hello Krushi अँप मोबाईल वर इंस्टॉल करून तुम्ही थेट Manufacturer कडून ते विकत घेऊ शकता. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. रोजचा बाजारभाव इथे समजतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते.

पुसा विवेक QPM 9 सुधारित (Pusa QPM 9 Advanced)
Provitamin A – 8.15 PPM
Lysine – 2.67 टक्के
ryptophan – 0.74 टक्के असते.

वाण पुसा HQPM 5 सुधारित (Pusa HQPM 5 Advanced)
Provitamin A – 6.77 PPM
Lysine – 4.25 टक्के
ryptophan – 0.94 टक्के.

सामान्य कॉर्न
प्रोव्हिटामिन ए – 1 ते 2 पीपीएम
लाइसिन – 1.5 ते 2.0 टक्के
ट्रिप्टोफॅन – 0.3 ते 0.4 टक्के

प्रो-व्हिटॅमिन-ए म्हणजे काय?
प्रो-व्हिटॅमिन-ए हा एक प्रकारचा साधा बीटा-कॅरोटीन आहे जो आपल्या आरोग्याच्या सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचबरोबर यामध्ये असणारे व्हिटॅमिन-ए देखील आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. प्रो-व्हिटॅमिन-ए गर्भवती किंवा नवीन मातांसाठी अत्यंत आवश्यक आहे. (Maize Production)

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रोविटामिन-ए रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी शक्ती देते. याच्या नियमित सेवनाने दृष्टी तीक्ष्ण होते आणि हाडे मजबूत होतात. प्रोव्हिटामिन-ए अंडी, दूध, गाजर, भाज्या, पालक, रताळे, पपई, दही, सोयाबीन आणि इतर पालेभाज्यांमधून आपल्याला मिळत असते.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) मागील आठ वर्षांच्या कालावधीत (2014-2022) एकूण 2 हजार 122 पिकांच्या नवीन जाती शोधून काढल्या आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी याबाबत नुकतीच संसदेत माहिती दिली आहे. ICAR ने जाहीर केलेल्या या वाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांत आमूलाग्र वाढ होऊन अन्नधान्याची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यास मदत झाली आहे. याचाच एक भाग म्हणजे ICAR ने प्रसिद्ध केलेले ‘पुसा विवेक QPM 9 Unnat’ आणि ‘Pusa HQPM 5 Unnat’ हे दोन वाण होय.

ICAR कडे 103 संशोधन संस्था आहेत ज्यात चार मानांकित विद्यापीठांचा समावेश आहे. ICAR संस्था/केंद्रांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी ICAR चे 74 अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (AICRP) आणि नेटवर्क प्रकल्पांद्वारे राज्य कृषी विद्यापीठांशी (SAU) मजबूत सहकार्य देखील आहे. तसेच ICAR द्वारे जिल्हा स्तरावर 731 कृषी विज्ञान केंद्रे (KVKs) स्थापन करण्यात आली आहेत.

error: Content is protected !!