Mango Rate : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्यांला मिळाला सर्वाधिक दर; पहा आजचा भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) : राज्यात यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. मात्र आंब्याची मागणी वाढली असल्याने आंब्याला बाजारात चांगला दर मिळत आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवी मुंबई एपीएमसी (APMC) बाजारात अधिक प्रमाणात आंब्यांची विक्री झाली आहे. ईद आणि अक्षयतृतीया या सणांमुळे आंब्याला आज सर्वाधिक दर मिळाला आहे.

आज मुंबई मार्केटमध्ये १५ ते १८ हजार आंब्यांच्या पेट्यांची आवक वाढल्याचे पाहायला मिळाले. कोकणातील हापूस कमी येत असल्यानं दरही वाढले आहेत. कोकणातील देवगड हापूसला ९०० रुपये भाव मिळतो आहे. मार्केटमध्ये ६० ते ६५ हजार आंबा पेटी येत आहे. तसेच दक्षिण भारतातून देखील आंब्यांची आवक होताना दिसतेय.

अक्षय्य तृतीया आणि ईद एकाच महिन्यात; ग्राहकांची आंबा खरेदीकडे कल

आज अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद असल्याने बरेच ग्राहक आंबा खरेदीसाठी आले होते. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम पिकांवर होत असल्याने आंब्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बाजारात चांगल्या दर्जाच्या आंब्याची मागणी वाढत असल्याने दर स्थिर राहिलेले आहेत. मात्र आता इथून पुढे दर काही प्रमाणात उतरण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे आंब्यांचे पीक धोक्यात

यंदा २०२३ या वर्षात राज्यातील काही भागात थंडीचे वातावरण, काही भागात अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने आंब्याला मोठा फटका बसला आहे. तसेच देशातील ओडिशा, उत्तर प्रदेश महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आंबा पिकांची नासाडी झाली आहे. यामुळे आंबा उत्पादक संकटात सापडला आहे.

शेतमाल : आंबा (Mango Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/04/2023
पुणे-मोशीलोकलक्विंटल798000100009000
राहतालोकलक्विंटल5600075006700
21/04/2023
श्रीरामपूरक्विंटल58300070006000
नाशिकहापूसक्विंटल259180002500022000
सांगली -फळे भाजीपालाहापूसक्विंटल973250050003750
मुंबई – फ्रुट मार्केटहापूसक्विंटल3763110003400022500
पुणे-मोशीलोकलक्विंटल22260002000013000
मुंबई – फ्रुट मार्केटलोकलक्विंटल108226000110008500
राहतालोकलक्विंटल6600075007000
कामठीलोकलक्विंटल21150025002000
हिंगणालोकलक्विंटल12160030003000
सोलापूरनं. १नग236160032002400
सोलापूरनं. १क्विंटल199300050003500
error: Content is protected !!