Milk Rate : 12 वर्षांनंतर दुधाची आयात होणार; दुधाच्या दरात होणार वाढ? सरकारचे भाकीत..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Milk Rate) : भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात शेती व्यवसायाला आजही मौल्य आहे. मागील वर्षात जनावरांना लम्पी आजार झाल्याने दुधाच्या किंमतीत (Milk Rate) घट पहायला मिळाली. भारतात एकूण २४ टक्के दूध उत्पादन पहायला मिळते. यंदा २२ टन दूध उत्पादन झाल्याची माहिती समोर आली. यंदा सरकारला दुधाची कमतरता जाणवत असल्याने यंदा दुधाची आयात करावी लागेल असं असा अंदाज सरकारने केला आहे. ही आयात १२ वर्षांनंतर पहायला मिळते.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

कोरोनाकाळात दुधाचे दर ८ ते १० टक्क्यांनी वाढले होते. दक्षिणेकडील भागात दुधाच्या साठ्याचा अंदाज घेतल्यास सरकार लोणी, तूप इतर दुग्धजन्य पदार्थांची आयात करू शकते. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर दुधाचे भाव कडाडले आहेत. यामुळे आता दुधाचे पदार्थ आयात करायचे म्हटले तरीही अवघड परिस्थिती पहायला मिळेल.

गुरांच्या लंम्पी आजाराने १. ८९ लाख गुरांचा मृत्यू झाला. याच कोरोना काळात दुधाच्या किंमतीत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली. आता दुधाच्या मागणीत वाढ झाल्याने सरकार दुधाच्या दारात वाढ करण्याच्या तयारीत आहे. २०२२ मध्ये म्हशीच्या दुधाचे दर हे ८५ होते. तेच दर आता ९० रुपयांपर्यंत पोहचणार आहेत. याचा परिणाम दुग्धजन्य पदार्थ आणि कॉफी, चहाच्या दरावर होऊ शकतो.

दुधाचे दर (Milk Rate)

  • अमूल दूध १ ली. ५६ रुपये दर , अर्धा ली. २८ रुपये दर
  • गोकुळ दूध १ ली. ७२ रुपये दर, अर्धा ली. ३९ रुपयेपर्यंत दर
  • महानंद दूध १ ली. ५५ रुपये दराने विक्री केली जाते.

सध्याची दुधाची परिस्थिती

  • सव्वा वर्षांपूर्वी दुधाच्या उत्पादनात जवळ जवळ १२ ते १५ टक्क्यांनी दर वाढ झाली होती.
  • २०२१ – २२ या वर्षात देशातील दूध उत्पादन हे ६.२५ वर्षांनी वाढले.
  • यापूर्वी २०११ मध्ये आपल्याकडे दुग्धजन्य पदार्थाची आयात करावी लागली होती आणि तीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवताना पाहायला मिळते आहे
error: Content is protected !!