Fertilizers used in Agriculture । 19:19:19, 12:61:00 हि खते आपल्याला माहिती असतात पण त्यांना अशी नावं का आहेत? विद्राव्य खतांच्या ग्रेड्‌स व वैशिष्ट्ये जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fertilizers used in Agriculture : विद्राव्य खतांच्या योग्य ग्रेड्‌स पिकाच्या योग्य अवस्थेत वापराव्यात. ही खते आम्लधर्मीय असल्याने ठिबकसंच चोकअप होऊन बंद पडत नाही.बाजारात विविध विद्राव्य खते उपलब्ध असून यात19:19:19, 20:20:00, 12:61:00, 00:52:34, 13:40:13, 00:00:50 +18, कॅल्शियम नायट्रेट. (Calcium Nitrate) अशा विविध ग्रेड्सचा समावेश आहे. मात्र या खतांना अशी नावं का आहेत? त्याचा काय अर्थ होतो आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? हे आपण आज्ज जाणून घेणार आहोत.

1) 19:19:19 / 20:20:00 –

यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत.
या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात.
यातील नत्र हा अमाईड, अमोनिअम/अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.
या खताचा प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेडचा उपयोग होतो.

2) 12:61:0 –

यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते.
नवीन मुळांच्या तसेच ( जोमदार शाकीय वाढीसाठी)फळ-फांद्यांच्या वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरूत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.
याला मोनो अमोनिअम फॉस्फेट म्हणतात.

3) 0:52:34 –

यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत.
फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.
डाळिंब पिकामध्ये फळांची योग्य पक्वता व सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत विशेषत्वाने वापरले जाते.
या खतास मोनो पोटॅशिअम फॉस्फेट म्हणतात.

4) 13:0:45 –

या खतास पोटॅशिअम नायट्रेट म्हणतात.
यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते.
फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्वता अवस्थेत या खताची आवश्‍यकता असते.
अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.
या खतामुळे पीक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरते.

5) 0:0:50 + 18 –

या खतामध्ये पालाश बरोबर उपलब्ध स्वरूपातील गंधक असतो.
पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.
हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते.
या खतामुळे पीक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरू शकते.
या खतास पोटॅशिअम सल्फेट म्हणतात.

6) 13:40:13 –

पात्या, फुले लागण्याच्यावेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबून कपाशीची बोंडे वा अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

7) कॅल्शियम नायट्रेट (Calcium Nitrate) –

मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या काळात व बोंडे किंवा शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

24:24:00 –

यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.
शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.
विद्राव्य खते ठिबक संचातून व्हेंच्युरी, बायपास दाब टाकी (प्रेशर टॅंक) किंवा थेट संचामधून देता येतात.

1) नत्र – झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
2) स्फुरद – पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.
3) पालाश – पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
4) जस्त – पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.
5) लोह – शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ खुंटते.
6) तांबे – पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.
7) बोरॉन – टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने
मरतात.
9) मॉलिब्डेनम – पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात. पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.
10) गंधक – झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.

error: Content is protected !!