हॅलो कृषी ऑनलाईन (Mushroom Cultivation) : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदीचे सावट असल्याचे बोलले जात आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्याही कर्मचाऱ्यांमध्ये कपात करत असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या डिजिटल युगात अनेकजण लॅपटॉपवरून आपले काम करतात. कोरोनानंतर काही कंपन्यांनी अजूनही आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली आहे. वर्क फ्रॉम होम करताना अनेकजण शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून चांगला नफा कमावत आहेत. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी लागवड करून लाखो रुपये मिळवून देणाऱ्या एका वनस्पतीबाबत माहिती देणार आहोत.
शहरी भागात मशरूमची मागणी वाढत आहे. त्याच्या पौष्टीक गुणधर्मांमुळे मशरूमला अतिशय चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी सध्या मशरूम लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. विशेषबाबत म्हणजे मशरूमची लागवड बंद खोलीत म्हणजे घरातही करता येते. याची पद्धत खूप सोपी असून फक्त थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत.
इथे खरेदी करा तुम्हाला हवी असलेली रोपे सर्वात कमी किमतीत
शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणतीही रोपे खरेदी करायची असल्याची सर्वात कमी किमतीत दर्जेदार रोपे फक्त Hello Krushi अँपवरच उपलब्ध आहेत. याचा लाभ घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला तुमच्या जवळच्या सर्व रोपवाटिका मालकांसोबत संपर्क करण्याची सोय आहे. शिवाय येथे ५० टक्क्यांहून अधिक सवलतीत रोपे विक्रीस उपलब्ध आहेत. आजच Hello Krushi इन्स्टॉल करून याचे लाभार्थी बना.
मशरूम वाढवण्यासाठी या गोष्टी घरात असणे आवश्यक आहे (Mushroom Cultivation)
- जर तुम्हाला घरच्या घरी मशरूमची लागवड करायची असेल तर धान/गव्हाचे देठ, मशरूम बियाणे 100 ग्रॅम, पाणी 10 लिटर, प्लास्टिक पिशवी पारदर्शक, थर्माकोल/ब्लँकेट, टब किंवा बादली या गोष्टी आपल्याकडे असणे गरजेचे आहे.
- पहिली गोष्ट म्हणजे देठ निर्जंतुक करणे. यासाठी देठावर गरम पाणी ओतावे. यानंतर, ते पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवा आणि ब्लँकेटने झाकून टाका.
- बादलीतून देठ काही वेळ काढा आणि रात्रभर कोरडे होऊ द्या. यानंतर, वाळलेल्या देठात मशरूमच्या बिया चांगल्या प्रकारे मिसळा. नंतर ते प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवा. पिशवी अशा प्रकारे बंद करा की त्यात ओलावा जाणार नाही.
- नंतर पिशवीत सुमारे 10 ते 15 छिद्रे करा. या पिशव्या सुमारे 20 दिवस अंधाऱ्या खोलीत ठेवा. 20 दिवसांनी पिशवी बाल्कनीत आणावी. ओलावा देण्यासाठी दररोज पाण्याची फवारणी करत रहा. काही दिवसात तुमच्या पिशवीतून मशरूम वाढू लागतील.
हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा
मशरूम फार्मिंग प्रोजेक्टसाठी सबसिडीज आणि लोन किती मिळते?
प्रशिक्षित मशरूम लागवड करणार्यांना लागवडीच्या प्रक्रियेचा प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर कर्ज दिले जाते. यामध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड / एनएचबी) ने मान्यता द्यावी लागते. त्यानंतर आवश्यक असलेल्या कर्जाच्या रकमेवर प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना या प्रकरणांची शिफारस केली जाते. Mushroom Cultivation
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ देखील मशरूमच्या शेतकर्यांना पतपुरवठा केलेल्या बॅक-एंड सबसिडीच्या स्वरूपात मदत पुरवतो. अनुदानाची रक्कम एकूण प्रकल्प खर्चाच्या 20% आहे (सामान्य भागात जास्तीत जास्त 25 लाख आणि डोंगराळ भागात 30 लाख इतके अनुदान मशरूम लागवडीसाठी देण्यात येते).
१.जागा : मशरूम उत्पादनाकरीता जागा ही बंदिस्त स्वरुपाची लागते. झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांमध्ये मशरूम उत्त्पन्न अत्यंत उत्तम घेता येते.
२.पाणी : पाणी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. मशरूम उत्पादनाकरिता पाणी स्वच्छ व शुद्ध हवे.
३.कच्चा माल : आळिंबी मशरूम करिता कच्चा माल म्हणजे शेतीमधील टाकाऊ घटक गव्हाचा भुसा, कपाशीच्या काड्या, भाताचा पेंढा, गवत, सोयाबीनचा
भुसा, कडबा इत्यादी.