Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात 13, 14, 15 एप्रिलला पुन्हा अवकाळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात आजपासून हवामान मोठा बदल होणार असल्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh Havaman Andaj) यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात १३, १४, १५ एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला असून शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. ७,८,९ एप्रिल रोजी राज्यात खूप पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यानंतर आता १३ एप्रिल पासून वातावरण पुन्हा खराब होणार आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे, नाशिक या जिल्ह्यांत तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. आज १३ एप्रिलपासून पासून राज्यातील ढगाळ वातावरण वाढणार आहे. तसेच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची कांदा काढणी चालू असून अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. जसा वेळ मिळेल तसा कांदा काढून झाकून ठेवावा असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे. सध्या हरभरा, कांदा, गहू, मका काढणी सुरु आहे. तसेच विदर्भात हळद काढणं सुरु आहे. शेतकऱ्यांनी शिजवलेल्या हळदी झाकून ठेवावि.

https://youtu.be/PtgqpmaBGJY

कोणकोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला अलर्ट –

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक १३ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यांनतर दिनांक १४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात पाऊस होणार आहे तर दिनांक १५ व १६ एप्रिल रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार आहे. (Panjabrao Dakh Havaman Andaj)

आपल्या गावातील हवामानाची माहिती मिळवण्यासाठी हे काम करा

शेतकरी मित्रांनो जर अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं नाव सर्च करा. नंतर ॲप इंस्टॉल करून ॲपमध्ये रोजच्या वातावरणाबद्दल अपडेट्स मिळवता येईल. यामुळे तुमचे शेतीतील नुकसान टाळता येऊ शकते.

राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक १४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, बीड व जालना जिल्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचे डाँ. के. के. डाखोरे (मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी) यांनी सांगितले आहे.

सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कसे राहील हवामान?

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून आज प्राप्त झालेल्या हवामान ईशाऱ्यानुसार कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात दिनांक ११,१२,१३,१४ व १५ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किमी इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की पक्व पिकांची काढणी व मळणी करावी व तयार शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. शेतकरी बांधवानी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. असे ग्रामीण कृषि मौसम सेवा, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!