Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) : राज्यात मागील दोन महिने अवकाळी पावसाने हाहाःकार माजवला होता. आता काही दिवस कडाक्याचे ऊन्ह सुरु असताना महाराष्ट्रात मान्सून किती तारखेला दाखल होणार याची माहिती समोर आली आहे. आज १९, २०, २१ मे रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

पावसाळा सुरु घोण्यास केवळ १०-१२ दिवस बाकी असून शेतकऱ्यांनी आपली कामे लवकर उरकून घ्यावीत असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे. पाऊस जवळ येत असल्याने शेतीची कामे आटोपून घ्यावीत, अनेकांची भुईमूग काढणीही बाकी असल्याने शेतकऱ्यांनी कामाचा चटका करावा असे डख यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात उद्यापासून पुढील 10 दिवस महत्वाचे! कोणकोणत्या जिल्ह्यांत होणार जोरदार पाऊस?

मान्सून केव्हा दाखल होणार? Panjabrao Dakh Havaman Andaj

२१, २२ मे रोजी अंदमान बेटावर मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यानंतर २६, २७ मे रोजी मान्सून वेगाने पुढे सरकणार असून भारतात मान्सूनचे दणदणीत आगमन होणार आहे. ८ जून नंतर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.

https://youtu.be/6TYvdzcbzYo

तुमच्या गावात पाऊस होणार का ते असं केले 1 मिनिटांत चेक

शेतकरी मित्रांनो वातावरणात कधी ऊन तर कधी पावसाचे पहायला मिळतो. यामुळे वातावरणात रोज बदल जाणवतो. आता आपल्याला स्वतःच्या आपल्या गावात पाऊस होणार का हे जाणून घेणं सोयीचं झालं आहे. यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. हॅलो कृषी अँपवर तुम्हाला जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन, सरकारी योजना, शेतमाल थेट खरेदी विक्री अशा बाबीचा आता एकही रुपये खर्च न करता लाभ घेता येतो.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस होणार?

२२, २३ मे ला राज्यात काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यांनतर ३१ मे ते ३ जून दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पाउसाळ्यासारखा पाऊस होणार आहे. यानंतर ४ जून ते ६ जून पर्यंत हवामान मोकळे राहील आणि ८ जून नंतर मान्सूनला सुरवात होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

error: Content is protected !!