Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह मोठा पाऊस होणार? हवामान खात्याने दिला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) : काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल पहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर वातावरण स्थिर पहायला मिळालं. आज (ता.२ एप्रिल) या दिवशी राज्यात उन्हाचा तडाखा २ ते ४ अंशाने वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच ७,८,९ एप्रिल रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांचा अजून गहू काढणे बाकी आहे. तसेच सध्या हळद, मका, कांदा काढणी चालू आहे. शेतकऱ्यांनी ५ एप्रिलच्या आत गहू, मका, कांदा काढून घेणे गरजेचे असल्याचे मत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. याबरोबरच कोकणातील आंबा शेतकऱ्यांनी देखील ७, ८, ९ एप्रिल दरम्यान काळजी घ्यावी असे डख यांनी सांगितले आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार काय?

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावातील हवामान अंदाज जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड केल्यांनतर इथे शेतकऱ्यांना पुढील पाच दिवसांचा स्वताच्या गावातील हवामानाच्या अंदाजाची माहिती देण्यात येते. आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज समजून घेऊन त्यावर आवश्यक खबरदारी काय घ्यावी, कोणत्या पिकावर काय औषध फवारणी करावी याची माहितीसुद्धा हॅलो कृषी अँपवर देण्यात येते. तेव्हा आजच गुगल प्ले स्टारला जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बाणा.

या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

राज्यात ७, ८, ९ एप्रिल दरम्यान विदर्भ व मराठवाडा विभागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, नांदेड, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर सहा सात दिवस हवामान कोरडे राहील व नंतर पुन्हा १४, १५, १६ एप्रिल रोजी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात गेले होते. एवढच नाही तर यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याचं पहायला मिळते. तर विदर्भातील काही भागात ३८ अंश सेल्सिअस तापमानात वाढ झाली आहे. तर इतर राज्यात ३१ ते ३७ अंश कमाल तापमान होते. किमान पारा हा १२ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत होता. परंतु आता राज्यातील तापमानाची वाढ होण्यामागचे कारण देखील समोर आले आहे.

https://youtu.be/nPtv1hN-Zeo

मध्य उत्तर प्रदेशात हवामानाचा पट्टा कमी झाला आहे. ओडिशा ते उत्तर तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून हवेचा कमी दाबाचा पट्टा सतत जाणवत आहे. पश्चिम राजस्थान आणि समुद्रसपाटीवरही हवेच्या कमी दाबाचा पट्टा सतत पहायला मिळतोय.

पश्चिम राजस्थान आणि समुद्रसपाटीलगत १.५ किमी उंचीवर वारे वाहत असल्याने कोरड्या हवामानाची स्थिती उपस्थित झाली आहे. यामुळे राज्यात उन्हाचा चटका अधिक अनुभवायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

error: Content is protected !!