Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) | राज्यात मान्सून केव्हा दाखल होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. आता पुन्हा पुढील चार दिवस मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २९ मे ते १ जून यादरम्यान राज्यात विविध भागात विजांच्या गडगडाटांसह मान्सूनपूर्व पाऊसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

आजपाऊसन पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहेत. २९ मे, ३० मे, ३१ मे आणि १ जून या दरम्यान राज्यात वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊसाची हाजरी लागणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. तसेच मान्सूनसुद्धा यंदा वेळेवर दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीमधील कामे वेळेवर उरकून घ्यावीत असा सल्ला देण्यात आला आहे. यंदा राज्यात चांगला पाऊस होईल असे बोलले जात आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज कसा मिळवावा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्याला आपल्या गावात सोसाट्याचा वर, अवकाळी पाऊस होणार का याची माहिती एक दिवस अगोदरच मिळणे शक्य झाले आहे. हॅलो कृषी या मोबाईल अँपच्या मदतीने लाखो शेतकरी प्रगत शेती करून आपला नफा कित्तेक पटींनी वाढवत आहेत. तुम्हीसुद्धा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या. इथे सातबारा उतारा, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, हवामान अंदाज, बाजारभाव अशा अनेक सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जातात.

https://youtu.be/sZJ1APi47WY

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? (Panjabrao Dakh Havaman Andaj)

राज्यात मान्सूनची प्रगत होत असल्याचे एकंदर दिसत आहे. २७,२८ मे पासून मान्सून प्रगती करत आहे. हे दोन दिवस राज्यात विविध भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये ४ जून पर्यंत मान्सून दाखल होणार आहे. केरळ नंतर ८ जूनपासून महाराष्ट्रात मान्सून पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर २२ जून पर्यंत सर्व महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.

कमाल तापमान राज्यात, २७.०५.२०२३
जेऊर 39.5
बीड 40.3
सोलापूर 39.8
नांदेड 40.2
जालना 40.1
परभणी 40
धाराशीव 40.0
उद्गीर 39.2
जळगाव 41
बाकी अन्य ठिकाणी 35-37°C

error: Content is protected !!