Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होणार; पहा नवीन हवामान अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj । राज्यात २५ जूनपासून मान्सूनचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून भाग बदलत पाऊस कोसळत आहे. पुढील ३ दिवस राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. यामध्ये २९ जून, ३० जून आणि १ जुलै रोजी सातारा, कोकण, पुणे, उत्तर महाराष्ट्र या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

तुमच्या गावात कधी पाऊस होणार?

आता आपल्या गावात कधी पाऊस होणार याबाबत अचूक माहिती मिळवणे सोपे झाले आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे शेतकऱ्यांना ते उभे असलेल्या ठिकाणाचा अचूक हवामान अंदाज देण्यात येतो. तसेच या अँपवर रोजचे बाजारभाव, सातबारा उतारा डाउनलोड करणे, जमीन मोजणे आदी सेवा मोफत देण्यात येतात. तुम्ही शेतकरी असाल तर हॅलो कृषी मोबाईल अँप तुमच्याकडे असायलाच हवे. आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करून अँप डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बना.

पुढील ३ दिवस कोणत्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस?

यंदा मान्सून थोड्या उशिरा दाखल झाला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनला उशीर झाला असला तरी यावेळी चांगला पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २९ जून ते १ जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीसह सातारा, पुणे या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यानंतर उत्तर महाराष्ट्रातील काही भागातही जोरदार पाऊस होणार आहे. यावेळी मराठवाडा, पूर्व विदर्भात विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबत राज्यातील इतर जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

https://youtu.be/KvDBHEIUNqQ

२ जुलै ते ८ जुलै राज्यभर मुसळधार पाऊस

राज्यात २ जुलै नंतर सर्वत्रच मुसळधार पावसाळा सुरवात होणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ८ जुलै पर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. २ जुलै पासून १० जुलै पर्यंत सोलापूर जिल्ह्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामध्ये मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, पुणे, कोकण या भागात सर्वाधिक तर पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पूर्व विदर्भ इथे पाऊस होईल असे सांगण्यात आले आहे. जुलै पहिला आठवडा अन दुसरा आठवडा खंड न पडता पाऊस होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

पेरण्या कधी? Panjabrao Dakh Havaman Andaj

राज्यात आता पावसाळा सुरवात झाल्याने अनेक भागात पेरण्यांना सुरवात झाली आहे. २ जुलै पासून ८ जुलै पर्यंत राज्यभरात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांची पेरणी १५ जुलै पर्यंत होईल असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!