Panjabrao Dakh : ऑगस्ट महिन्यात कसा असणार पाऊस? पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला जाणून घ्या, लागवड, जातींची निवड अन खत कीड नियंत्रण कसं करायचं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : उद्यापासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १५ ऑगस्ट नंतर वातावरण बदलणार आहे. १८ व १९ ऑगस्ट नंतर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. 

पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला (Soyabean Market)

लागवडीचे अंतर

सोयाबीन लागवड करताना सुरुवातील दोन ओळींमधील अंतर निवडणे महत्त्वाचे आहे. पूर्वी आम्ही १४ इंचावर सोयाबीनची पेरणी करायचो. मात्र, अंतर दाट झाल्यामुळे उतार कमी यायचा. त्यानंतर १८ इंचावर सोयाबीन लागवड करण्याचा प्रयोग केला. त्यामध्ये  उतार चांगला मिळाला, एकरी २१ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यानंतर यंदा २४ इंचावर सोयाबीन पेरणीचा निर्णय घेतला आहे. कारण पिकामध्ये अंतर जास्त ठेवल्यामुळे हवा खेळती राहते व शेंगाचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते. 

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

जातींची योग्य निवड

सोयाबीनच्या विविध जाती कृषी विद्यापीठांनी विकसित केल्या आहेत. त्या जातींचा वापर शेतकर्‍यांनी पेरणीसाठी केला पाहिजे. सोयाबीनच्या दोन जातींची निवड केली पाहिजे. त्यामध्ये लवकर येणारी व उशिरा येणारी अशा जाती निवडल्या पाहिजेत. जेणेकरून जास्त पाऊस झाला तर दोन्हीपैकी एक पीक हाती येऊ शकते. मी स्वतः २०१० पासून प्रात्यक्षिकासह अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की, परभणी येथील  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनची ‘६१२’ ही चांगली जात विकसित केली आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे पिकाला खोडकिडा लागत नाही; जास्त पावसातही उभा राहणारी, खाली न लोळणारी जात आहे. तसेच याच कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ‘७१’ ही जातही चांगली आहे.अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘आंबा’ ही लवकर येणारी सोयाबीनची जात विकसित केली आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ‘दुर्वा’ सोयाबीनचा लवकर येणारा वाण आहे. तसेच मध्यप्रदेशातील ‘२००१’ ही चांगली जात आहे. सोयाबीनचा ‘९१०५’ हा सुध्दा चांगला वाण आहे. ज्या शेतकर्‍यांची जमीन काळी आहे आणि उत्पादन चांगले घ्यायचे असेल तर त्या शेतकर्‍यांनी ‘फुले किमया’ या जातीचा वापर करावा. ही जात जास्त उत्पादन देते.  Panjabrao Dakh Havaman Andaj

खत व्यवस्थापनातून झाली उत्पादनात वाढ

योग्य खतव्यवस्थापनामुळे मला मागील वर्षी एकरी २१ क्विंटल उत्पादन मिळाले. गेल्या वर्षी पाऊस जास्त होता म्हणून लागवडीसोबत १० कि.ग्रॅ. गंधक पिकाला दिले. लागवडीसाठी एकरी ३२ कि.ग्रॅ. सोयाबीनचे बियाणे लागले. बरेचशे शेतकरी लागवडीनंतर २० दिवसानंतर खते देत नाहीत. पुन्हा २० दिवसानंतर एकरी १०० कि.ग्रॅ. सुपर फॉस्फेट पिकाला दिले. पीक ४० दिवसाचे झाल्यानंतर १२:३२:१६ हे खत पिकाला दिले. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली. 

तणनियंत्रण कसे करावे?

सोयबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करताना जमिनीच्या पृष्ठभागावर सगळीकडे तणनाशक पडेल याची काळजी घ्यावी.

कीड व रोग नियंत्रण

सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक’ हा रोग प्रामुख्याने आढळतो. हा रोग पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. बरेचसे शेतकरी हे कीटकनाशक व बुरशीनाशक या दोनच औषधांची फवारणी करतात. मात्र, शेतकर्‍यांनी पांढरी माशी, अळी आणि बुरशी नियंत्रणासाठी तीन औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!