PM Kisan : पंतप्रधान किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट! आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ‘इतके’ रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (PM Kisan) : केंद्र सरकारने (Central Government) शेती क्षेत्राला चालना मिळावी तसेच आर्थिकदृष्ट्या शेतकरी सक्षम बनावा यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजनेकडे पाहिले जाते. देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मैलाचा दगड ठरत आहे.

या योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होत असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर (Bank Account) वर्षाला सहा हजार रुपये पाठवण्यात येत आहेत. आता १४ व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आली असून हा हप्ता कोणत्या तारखेला देण्यात येणार? अन किती रुपये रक्कम शेतकऱ्याला मिळणार याबाबत आम्ही तुम्हाला या बातमीत माहिती देणार आहोत.

सरकारी योजनेला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्र सरकार वर्षभरात एकूण तीन हप्त्यांमध्ये चार महिन्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवते. काही दिवसांपूर्वीच १३ व्या हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र आता १४ व्या हफ्त्याचे पैसे देखील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. १४ वा हफ्ता हा मे महिन्याच्या अखेरीस किंवा पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे.

14 वा हप्ता मिळवण्यासाठी आजच करा हे काम

शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा चौथा हप्ता हवा असेल तर तुम्हाला एक काम करणे अतिशय गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. गुगल प्ले स्टारला जाऊन तुम्ही हे अँप डाउनलोड करून घेऊ शकता. इथे शेतकरी योजनांची माहिती मिळवा आणि एका क्लिकवर kyc update देखील करता येऊ शकते. त्यासह जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, शेतकरी दुकान, हवामान अंदाज आदी सेवांचाही लाभ घेता येतो.

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ‘इतके’ रुपये

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत यापूर्वी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर ६००० रुपये जमा होत होते. परंतु आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता राज्य रासकर आणि केंद्र सरकार यांच्या तर्फे एका वर्षात तब्बल १२ हजार रुपये मिळणार आहेत.

E KYC करणे बंधनकारक

पीएम किसान योजनेसाठी e – kyc बंधनकारक करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्याचे किंवा पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे e – kyc नसेल तर त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी ई – केवायसी अपडेट करून घ्यावी. यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ई- केवायसी करू शकता.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ

कुटुंबातील महिला शेतकरी किंवा पुरुष शेतकरी दोघेही अल्पभूधारक आहेत. तर त्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दोघांना एकदम लाभ मिळणे हे या योजनेच्या नियमावलीतून बाहेर आहे.

error: Content is protected !!