हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान योजनेचा (PM Kisan Scheme) १३ वा हाफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला. मात्र आता शेतकरी १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ होईल. यासाठी जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात १४ वा हप्ता येणे गरजेचे आहे. मात्र याबाबत सरकारने अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येईल? असा सवाल उपस्थित झाला आहे.
PM Kisan चा १४ वा हप्ता मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
१२ व्या हप्त्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर १६ हजार कोटी एवढा निधी पाठवला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात १६ हजार ८०० कोटी रुपये खात्यात पाठवण्यात आले. आता मात्र १४ वा हप्ता ८ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी E-kyc अपडेट करणे गरजेचे आहे. ई-केवायसी करताना बँक खात्याचे तपशील, आधार कार्ड तपशील, भूलेख पडताळणी असणे आवश्यक आहे. जे शेतकरी आवश्यक कागदपत्रे जोडणार नाहीत. त्यांना हप्त्याचा लाभ मिळवता येणार नाही.
14 वा हप्ता मिळवायचा असेल तर हे करा
शेतकरी मित्रांनो जर आपल्याला १४ व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर एक गोष्ट मात्र करावी लागेल. Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरला जाऊन हॅलो कृषी ॲप इंस्टॉल करा. या ॲपमध्ये आपल्याला आवश्यक त्या योजनांची माहीत मिळवता येऊ शकते. तसेच एका क्लिकवर E -kyc अपडेट देखील करता येईल. जमीन मोजणी, हवामान अंदाज, नकाशा मोजणी, शेतकरी दुकान, सात बारा उतारा आदी सेवांचा लाभ मिळवता येईल.
कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ
कुटुंबातील महिला शेतकरी किंवा पुरुष शेतकरी दोघेही अल्पभूधारक आहेत. तर त्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दोघांना एकदम लाभ मिळणे हे या योजनेच्या नियमावलीतून बाहेर आहे.