PM Kisan : 2000 रुपये हवे असतील तर आजच करा ही 2 कामे; 14 व्या हप्त्याबाबत मोठा अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये देण्यात येतात. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हि रक्कम पाठवण्यात येते. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आता तुम्हाला २००० रुपये हवे असतील तर काही गोष्टींची वेळेवर पूर्तता करणे गरजेचे आहे. काही दिवसांतच १४ व्या हप्त्याचे पैसे जमा होणार असून याबाबत सरकारने अपडेट जारी केला आहे.

PM Kisan चा १४ वा हप्ता मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दर 4 महिन्यांच्या अंतराने 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ हप्ते जमा झाले आहेत. 14 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच आता १४ वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

तुमचे नाव ह्या योजनेत आहे कि नाही ते तपासून पहा

१३ वा हफ्ता प्राप्त करणारे आणि त्यासाठी आपले नाव नमूद करणारे शेतकरी आता त्यांना पुढच्या महिन्यात ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो कि नाही हे तपासून पाहू शकतात आणि जर त्यांना तो हफ्ता मिळणार असेल तर तो कधी मिळेल ह्या बाबत आता शेतकरी अगदी सहजपणे जाणून घेऊ शकतात. त्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर हॅलो कृषी अँपवर सरकारी योजना विभागात जाऊन पीएम किसान निवडून त्यामध्ये लाभार्थींच्या सूचित (PM Kisan veneficiary List) आपले नाव आहे कि नाही तसेच ती यादी पाहून आपण जाणू शकतो कि आपल्याला पी एम किसान योजनेच्या १४ व्या हफ्त्यातील २००० रुपयांचा चा लाभ मिळणार आहे कि नाही

eKYC केलीय का?

तुम्हाला पीएम किसानचा 14 वा हप्ता हवा असेल तर तुमचे ई-केवायसी पूर्ण असणे गरजेचे आहे. तुम्‍ही अद्याप केवायसी केले नसेल तर ते लवकर करून घ्या. शेतकरी मोबाइलवरूनच Hello Krushi या अँपच्या मदतीने या बाबी पूर्ण करू शकतात.

पीएम किसानचा 14 वा हप्ता मिळविण्यासाठी जमिनीची पडताळणी करणे देखील आवश्यक आहे. लाभार्थी शेतकरी त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन जमिनीची पडताळणी करू शकतात. जर शासनाच्या नियमांमध्ये तुमची जमीन बसत नसेल तर तुमचे नाव पी एम किसानच्या यादीतून वगळण्यात येते.

लाभार्थी यादीतील नाव कसे तपासावे?

सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi हे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यावे लागेल.
यानंतर सरकारी योजना या विभागात जाऊन PM Kisan येथे क्लिक करावी.
येथे तुम्हाला ‘लाभार्थी स्थिती’चा पर्याय मिळेल.
आता तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा 10 अंकी मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.
या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर आता तुम्हाला तुमची स्थिती स्क्रीनवर दिसेल. स्टेटस दिसताच, e-KYC, पात्रता आणि जमीन साईडिंगच्या पुढे लिहिलेला संदेश पहा.
या तिघांच्या पुढे ‘हो’ लिहिल्यास हप्त्याचा लाभ मिळू शकतो. या तिघांच्या पुढे किंवा यापैकी कोणाच्याही समोर ‘नाही’ लिहिले तर पुढील हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.

येथे संपर्क करू शकता

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी शेतकरी [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

error: Content is protected !!