PM Kisan : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या नवीन नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Sanman Nidhi : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा भारताचा पारंपरिक व्यवसाय आहे हे लहानपणापासून शाळेत शिकवलं आहे. याच शेतकऱ्यांनी कोरोना (Covid 19) च्या काळात देशालाच नाही तर अवघ्या जगाला सावरलं आहे. तेव्हापासून केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांचं कौतुक करत आहे. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शेतकरी सशक्त व्हावा या उद्देशाने ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM Kisan Sanman Nidhi) ही योजना विकसित केली. ज्यात शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये अनुदान दिलं जातंय.

8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना PM Kisan सन्मान निधीचा लाभ

‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ ही देशातील ८ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. यातील १३ हप्ते हे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होईल. १४ वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. पण तरीही शेतकऱ्यांना बऱ्याचदा सन्मान निधी हप्ते मिळण्यातही अडचणी येतात. यामुळे लाभार्थ्यांना त्यांची पात्रता आणि योजनेचे नियम माहीत असणे आवश्यक आहे.

सरकारी योजनेला अर्ज कसा करायचा?

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या महा ई -सेवेत जाऊन चकरा मारण्याची गरज नाही. आत्ताच Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि घरबसल्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. हॅलो कृषीमध्ये या व्यक्तिरिक्त, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकटात मिळत आहेत. यासाठी आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी या तीन घटकांची तपासणी करा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी ई – केवायसी, आधार सिडिंग आणि जमीन सिडिंग या तीन बाबी गरजेच्या आहेत. ही तिन्ही कामे पूर्ण झाली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील. ई- केवायसीसाठी जवळच्या जनसेवा केंद्राशी संपर्क साधू शकता. जमीन सिडिंगसाठी बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल. त्यानंतरच पुढील प्रक्रियेस सुरुवात करता येईल. एका क्लिकवर घरबसल्या ई – केवायसी करता येईल. यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.

घरबसल्या करा ई – केवायसी फक्त एका क्लिकवर

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात मात्र, याच योजनेचे पैसे खात्यावर येत नसतील तर त्यासाठी घाबरण्याचं काहीही एक कारण नाही. प्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटला जाऊन भेट द्या. फार्मर्स कॉर्नरवर जाऊन E – Kyc वर क्लिक करा. त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक टाकून एंटर करा. याप्रकारे आपण आपले ई – केवायसी डॉक्युमेंट जोडू शकाल.

योजनेतून लाभार्थ्यांचे नाव वगळले तर काय कराल?

या योजनेचे लाभार्थी असंख्य शेतकरी आहेत. बऱ्याचदा लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते. काही वेळा या योजनेच्या यादीतून लाभार्थ्यांचं नाव देखील वगळलं जातं. यामुळे या योजनेच्या माध्यमातून आपलं नाव तपासत राहणं गरजेचं आहे. सुरुवातीला pmkisan.gov.in या वेबसाईटला जाऊन भेट द्या. शेतकरी कॉर्नरच्या लाभार्थी स्थिती या पर्यायावर जाऊन क्लिक करा. या ठिकाणी लाभार्थ्याने दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि नोंदणी क्रमांक टाकावा. शेवटी कॅप्चा कोड त्या ठिकाणी येईल. तो कोड टाकून सबमिट करा. अशाप्रकारे शेतकरी लाभार्थी स्वतःचा दर्जा स्वतः तपासू शकतात.

error: Content is protected !!