BUDGET 2023 : अर्थसंकल्पात PM Kisan योजनेबाबत काय घोषणा झाली? शेतकऱ्यांना सरकारने दिली हि गुड न्यूज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने भरघोस निधीची तरतूद केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेसंदर्भात अर्थसंकल्पात काही मोठी घोषणा करण्यात येणार अशी चर्चा होती. मात्र आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी पीएम किसान योजनेचा उल्लेख केलेला नाही. अर्थसंकल्पात पीएम किसानबाबत (PM Kisan) कोणतीही घोषणा करण्यात आली नसली तरी सरकारने य आयोजनेबाबत शेतकऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे.

पंतप्रधान किसान योजनेचा अनेक शेतकरी गैरवापर करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. जे नागरिक या योजनेला पात्र नाहीत ते सुद्धा खोट्या कागदपत्रांच्या साहाय्याने पीएम किसानचा हप्ता घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे 11 व्या हप्त्यापासून सरकारने ई-केवायसी आणि जमीन अभिलेख पडताळणी अनिवार्य केली आहे. मात्र अद्याप लाखो शेतकऱ्यांनी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. परिणामी अशा शेतकऱ्यांच्या खात्यात 12 वा हप्ताही जमा झाला नव्हता आणि आता 13 वा हप्ताही जमा होणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे. मात्र जे शेतकरी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करतील अशांना केंद्र सरकारने गुड न्यूज दिली आहे.

PM Kisan योजनेचे Rs 4000 खात्यावर मिळवण्यासाठी आजच करा हे काम

शेतकरी मित्रांनो PM Kisan योजनेचा 13 वा हप्ता तुमच्या खात्यावर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून आजच Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला 4000 रुपये खात्यावर मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्याची सुविधा आहे. तसेच तुमचे नाव 13 व्य हप्त्यासाठी आहे का हे सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता. शिवाय सरकारच्या कोणत्याही योजनेला अर्ज करण्यासाठी हे अँप अतिशय महत्वाचे आहे. तसेच सातबारा उतारा, तेव्हा आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी बना.

पंतप्रधान किसान योजनेचा 13 वा हप्ता 15 फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. जे शेतकरी १३ वा हप्ता जमा होण्यापूर्वी ईकेवायसी, जमीन अभिलेख पडताळणी प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना 12 व्य हप्त्याचे थकीत 2000 रुपये अन 13 व्य हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून एकूण 4000 रुपये एकाच वेळी मिळणार असल्याचे सरकरने सांगितले आहे. लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सन्मान निधीशी संबंधित कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र पायाभूत सुविधा मजबूत करणे, कृषी तंत्रज्ञान वाढवणे, नैसर्गिक शेती वाढवणे, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, सूक्ष्म खत, कृषी स्टार्टअप आणि सहकारातून समृद्धी यावर सरकारने भर दिल्याचे दिसत आहे. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी अर्थसंकल्प 2023 मध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. पुढील 3 वर्षांत 2 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे सरकारचे स्वप्न असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. यासाठी देशभरात 10,000 बायो इनपुट रिसर्च सेंटर्सची स्थापना करण्यात येणार असून भारखोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.

नव्या अर्थसंकल्पात सूक्ष्म खताची उपलब्धता वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत जागरूक करण्यासाठी पीएम प्रणाम योजना (पीएम प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर अॅग्रीकल्चर मॅनेजमेंट योजना) सुरू करण्यात येणार आहे. गोबर धन योजनेंतर्गत शेण आणि त्याच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी 10,000 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी अर्थसंकल्प 2023 मध्ये कर्जाचे उद्दिष्ट 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेषत: पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना आता कर्ज घेणे सोपे होणार आहे.

तसेच शेतीशी संबंधित ग्रामीण भागात उत्पन्न आणि रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने, कृषी स्टार्ट-अपला चालना देण्यासाठी सरकारने विशेष पाऊले उचलली आहेत. यासाठी डिजिटल एक्सीलरेटर फंड ‘कृषी निधी’ तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकार से समृद्धी अभियानांतर्गत 63000 कृषी सोसायटय़ांचे संगणकीकरण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

error: Content is protected !!