PM Kisan Yojana : 13 व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात? पण तरीही मिळणार नाहीत 2000 रुपये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Yojana) 13व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या हप्त्याबाबत एक अपडेट समोर आली आहे. या महिन्याच्या कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होऊ शकतात. मात्र, तत्पूर्वी या योजनेच्या लाभार्थी यादीतील सततच्या त्रुटी पाहता शासनाने जमिनीच्या नोंदींची पडताळणी वेगाने सुरू केली आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेसोबत इतर कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करायचा असले तर आता तुमचं काम अधिक सोपे झाले आहे. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसून सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता. यासाठी खालील स्टेप्स फॉलोअ करा.
१) तुमच्या मोबाईलवर Hello Krushi नावाचे अँप इन्स्टॉल करून घ्या.
२) गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च केल्यास तुम्हाला हे अँप मिळेल.
३) त्यानंतर App इन्स्टॉल करून मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा.
४) आता App ओपन केल्यांनतर होमस्क्रीनवरील सरकारी योजना या विंडो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या योजनेवर क्लिक करून माहिती जाणून घ्या.
५) योजनेला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply या बटनावर क्लिक करून तुम्ही थेट मोबाइलवरुन आता कोणत्याही योजनेला अर्ज करू शकता.

योजनेसाठी पात्र झाल्यानंतरही, तुम्ही 13व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता

पीएम किसान योजनेअंतर्गत 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होत आहेत. तथापि, या योजनेसाठी पात्र झाल्यानंतरही, आपण रु. 2000 पासून वंचित राहू शकता. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशाना यापासून वंचित राहावे लागू शकते. तेव्हा शक्य तितक्या लवकर पुढील हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

या शेतकऱ्यांवर सरकार करणार कडक कारवाई

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या लोकांविरोधात सरकार कठोर पावले उचलत आहे. 12 व्या हप्त्या दरम्यान, एकट्या उत्तर प्रदेशातून 21 लाखांहून अधिक लोकांची नावे काढून टाकण्यात आली होती. ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही मोठ्या प्रमाणावर नावं कमी करण्यात आली आहेत. भूमी अभिलेखांच्या पडताळणीत बनावट आढळून आलेल्या लोकांना सरकार सातत्याने नोटिसा पाठवत आहे.

शेतकरी येथे संपर्क करू शकतात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याबाबत, शेतकरी अधिकृत ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधू शकता. येथे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटू शकतात.

error: Content is protected !!