PM Kisan Yojana : तुम्ही रेशन कार्ड अपलोड केले का? 13 वा हप्ता तुम्हाला मिळणार का ते असे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरु केली आहे. आता या योजनेला जवळपास ५० महिन्यांचा कालावधी पूर्ण होतो आहे. आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 हप्ते जमा झाले आहेत. आता शेतकरी 13 वा हप्ता जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. १३ वा हप्ता जमा करण्यापूर्वी सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत. शेतकऱ्यांना आता आपण योजनेस पात्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी काही कागदपत्रे अपडेट करणे सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे. जे शेतकरी खालील गोष्टींची पूर्तता करणार नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 वा हप्ता जमा होणार नाही अशा स्पष्ट संकेत सरकाकडून देण्यात आला आहे.

PM Kisan Yojana चा हप्ता मिळवण्यासाठी आजच करा हे काम

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सरकारच्या योजनेचे पैसे खात्यावर मिळवायचे असतील तर तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप असणे अतिशय गरजेचे आहे. इथे तुम्हाला सरकारी योजनेबाबत सखोल माहिती देण्यात येते. तसेच सरकारी पातळीवर काहीही बदल झाला अन तुमचं कागदपत्र अपडेट करायचे असल्यास इथे तुम्हाला कळवण्यात येते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या अँप वरून सोप्प्या पद्धतीने Online अर्ज करू शकता. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं नाव टाईप करून हे अँप इंस्टॉल करून घ्या.

रेशन कार्ड अपडेट करा

पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिला जातो. केवळ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेले छोटे शेतकरी 6,000 रुपयांच्या मदतीसाठी पात्र आहेत. यापुढे शासनाने शेतकऱ्यांसाठी शिधापत्रिकेची कागदपत्रेही अनिवार्य केली आहेत. जे नवीन शेतकरी या योजनेत सहभागी होणार आहेत त्यांनी आपले रेशनकार्ड अपलोड करणे आता गरजेचे आहे. जुन्या शेतकऱ्यांनाही लवकरच शिधापत्रिका अपलोड करण्याच्या सूचना मिळू शकतात. यामुळे ज्या शेतकऱ्यांना खरोखर सरकारी मदतीची गरज आहे फक्त त्यांनाच आता PM Kisan योजनेचा हप्ता मिळणार आहे.

ई-केवायसी

पीएम किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड अपलोड करून चालणार नाही. आतापासून ई-केवायसी म्हणजेच बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य झाले आहे. तेव्हा लवकरात लवकर तुमचे बँक खाते आधारही लिंक करून घ्या. ज्या शेतकऱ्यांचे eKYC पूर्ण झालेले नाही अशांना सरकार २००० रुपये पाठवणार नाहीये. जर तुम्हाला 12 वा हप्ता मिळाला नसेल, तर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, 12 व्या आणि 13 व्या हप्त्यासाठी पैसे एकत्र मिळतील. अधिक माहितीसाठी, तुम्ही Hello Krushi हे मोबाईल अँप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता.

जमिनीच्या नोंदींची पडताळणी

11 व्या हप्त्यापासून पीएम किसान योजनेत अनेक अडथळे दिसले आहेत. एकाच कुटुंबातील दोन सदस्य पीएम किसानच्या हप्त्यांचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. तसेच काही भूमिहीन आणि समृद्ध शेतकरीही या योजनेचा लाभ घेत होते. यामुळे सरकारी योजनेचा गैरवापर होऊन गरजूंऐवजी इतरांना लाभ जात होता. ही फसवणूक रोखण्यासाठी कृषी मंत्रालयाने जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणे बंधनकारक केले आहे.

कागदपत्रे पुन्हा तपासा

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याला उशीर होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शेतकऱ्याचे चुकीचे तपशील प्रविष्ट करणे किंवा तपशीलांची कमतरता हे आहे. अर्ज करताना योग्य आधार क्रमांक, योग्य मोबाईल क्रमांक, योग्य बँक खाते क्रमांक, योग्य पॅनकार्ड क्रमांक आणि त्यांचा पत्ता टाकणे ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. यापैकी कोणत्याही कागदपत्रांमध्ये बदल असल्यास, pmkisan.gov.in वर तुमचा नोंदणी क्रमांक टाकून सर्व माहिती अपडेट करा, जेणेकरून पुढील हप्ता खात्यात पोहोचेल.

13 वा हप्ता तुम्हाला मिळणार का ते असे तपासा

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता तुमच्या खात्यात येईल की नाही हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुमचा लाभार्थी दर्जा तपासत रहा. याकरता तुम्ही Hello Krushi अँप चा वापर करू शकता.

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या
  • pmkisan.gov.in वर जा.
  • फार्मर्स कॉर्नरच्या विभागात जा.
  • लाभार्थी यादीवर क्लिक करा.
  • तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • तुम्ही Get Report वर क्लिक करताच अहवाल उघडतील. तुमचे नाव येथे तपासा.

तुमच्या हप्त्याच्या स्टेटसच्या पुढे ‘Rft Signed By State’ असे लिहिले असेल, तर लवकरच सन्मान निधीचे पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.

error: Content is protected !!