मुंबई । नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील सततचे चढउतार यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतात. (Sarkari Yojana) यानंतर आर्थिक टंचाई भासून बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरत नाही. मात्र सरकारचे चुकीचे धोरण अन हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्याचे शेतीवरील खर्च वाढतो अन त्याप्रमाणात नफा मात्र मिळत नाही. परिणामी शेतकरी राजा कर्जबाजारी होऊन जातो. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी (Agriculture News) दिली आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी सरकारने 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
असा करा मोबाईलवरून योजनेसाठी अर्ज
शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. Hello Krushi या मोबाईल अँपवरून तुम्ही स्वतः आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करू शकता. शिवाय रोजचा बाजारभाव, जमीनीचा सातबारा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज आदी सेवाही इथे मोफत मध्ये उपलब्ध आहेत. यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करा.
योजनेला अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलोअ करा –
- गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करा अन अँप इन्स्टॉल करा.
- यांनतर मो. नं. टाकून फ्री मध्ये रजिस्ट्रेशन करा.
- आता होम स्क्रीनवर तुम्हाला सरकारी योजना अशी विंडो दिसेल.
- सरकारी योजना या विंडोमध्ये जाऊन तुम्हाला हवी ती योजना निवडा अन खाली दिलेल्या Apply बटनावर क्लिक करा.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahatma jyotiba phule karj mukti yojana) कर्जमुक्तीची घोषणा केली होती. आज या योजनेकरिता सरकारने ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेद्वारे नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱयांना ५० हजार रुपया पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
14 लाख शेतकऱ्यांना लाभ Sarkari Yojana
मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत याकरता जवळपास ६ हजार कोटी रुपयांचा निधी लागेल असा अंदाज होता. या योजनेचा एकूण १४ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.
कोणाला मिळणार लाभ?
- जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- याकरता 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या कालावधीत सदर शेतकऱ्याने नियमित कर्जफेड केली आहे का हे तपासले जाईल.
- या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.