Sarkari Yojana : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । आपल्याला देशाला कृषिप्रधान (Agriculture) देश म्हणून जगभर ओळखले आते. सरकारही वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Sarkari Yojana)) तयार करत असते. बऱ्याचदा शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांना अर्ज करताना अडचणींचा सामना करावा लागतो. आता सरकारच्या सर्व योजना डिजिटल असूनही शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर माहिती पोहोचत नाही. आता शेतकऱ्यांसाठी सरकाने एक गुड न्यूज दिली आहे. डीबीटी पोर्टलवरून सरकारी योजनांना अर्ज करताना आता एकाच अर्जावर एकूण १४ योजनांचा लाभ घेता येणार आहे.

शेतकरी मित्रांनो एकतर सरकारी योजनांची (Government Scheme) माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. पोहोचलीच तर ती अर्ज प्रक्रिया सुरु असताना पोहोचत नाही. यामुळे अनेक शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. मात्र आता हॅलो कृषीच्या मदतीने तुम्ही या सर्व समस्यांवर मात करू शकणार आहेत. सरकारच्या कोणत्याही योजनेला आता तुम्ही तुमच्या मोबाइलवरूनच अर्ज करू शकणार आहेत. यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi या नावाचं मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या.

इथे तुम्हाला केंद्र, राज्य तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या सर्व योजनांबाबत माहिती मिळते. सोबत तुम्हाला थेट अँप वरूनच अर्ज करण्याची सुविधा असून याचा ५० हजारहून अधिक शेतकरी सध्या लाभ घेत आहेत. यासोबत Hello Krushi अँपवर तुम्हाला जमिनीचा सातबारा, डिजिटल सातबारा, भूनकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच रोजचा बाजारभाव स्वतःला चेक करता येतो. जमिनीची मोजणीही करता येते. तेव्हा खाली दिलेल्या Download बटनावर क्लिक करून आजच या सेवेचा मोफत लाभ घ्या.

शेतकरी मित्रांनो तुम्ही आता डीबीटी वरून एकवेळा एखाद्या योजनेला अर्ज केला कि नंतर तोच अर्ज एडिट करून तुम्ही पुन्हा दुसऱ्या योजनेलाही अर्ज करू शकणार आहेत. तसेच एखाद्या योजनेला अर्ज करतानाच तुम्हाला योजनांची निवड करण्याचा पर्याय दाखवण्यात येतो. तुम्ही यातील कितीही पर्यायांची निवड करू शकता. यानंतर लॉटरी पद्धतीने तुमचा नंबर जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सदर योजनेचा लाभ मिळतो.

सरकार सातत्याने शेतकरी उपयोगी योजना बनवत आहे. शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान, यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ मिळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच.

‘या’ आहेत कृषीच्या योजना (Sarkari Yojana)

  • राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन (मल्चिंग, कोल्ड स्टोरेज, सामुहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शेडनेट, रेपरव्हॅन)
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे, ठिबक, तुषार)
  • बिरसामुंडा कृषी क्रांती योजना (अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे)
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (बियाणे, पॉवर टेलर, मळणी यंत्र, रोटावेटर, पंप, पाईप वगैरे)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना (अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे)
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (दोन हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीसाठी १०० टक्के अनुदान)
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना (५० टक्के अनुदान, नर्सरीसाठी शेडनेट, पॉलिटनेल, प्लास्टिक करेट)
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना (शेततळे अस्तीकरण, शेडनेट, पॉलीहाऊस, कांदा चाळ)
  • राज्य कृषी योजना (ट्रॅक्टर, आवजारे)
  • कृषी यांत्रिकी उपअभियान (ट्रॅक्टर, आवजारे)
  • राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर एक लाख व सव्वालाख अनुदान व आवजारे ४० टक्क्यांपर्यंत अनुदान)
error: Content is protected !!