Satara News : अफूची शेती करणार्‍या शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई; 3 लाखांची अफू जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी (Satara News) : अफूची शेती करणाऱ्यांचे प्रमाण सध्या वाढल्याचं पाहायला मिळतंय. अफूची शेती बेकायदेशीर असून अशी शेती करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत. मराठवाडा, विदर्भात अफू शेती (Opium Farming) करणाऱ्यांच्या बातम्या आपण पाहत असतो. परंतु आता पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही याचे वारे आले आहे.

सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अफूची शेती कल्याचे समोर आले आहे. फलटण तालुक्यातील मुलींकवडी गावाचे हद्दीत बाचकी नावाचे शेतात सुरेश शिवराम पवार याने त्याचे मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी शेतात छापा मारला. यावेळी पवार एकुण 2737 झाडांची लागवड करुन त्याची जोपासना करीत असताना मिळुन आला.

शेतकरी असाल तर हे मोबाईल अँप तुमच्याकडे पाहिजेच

शेतकरी मित्रांनो सरकारी योजना, सातबारा उतारा, जमीन मोजणी, खरेदी विक्री अशा अनेक सुविधा मोफत देणारे Hello Krushi हे अँप सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. यावर तुम्हाला रोजचा बाजारभाव पाहता येतो, कोणत्याही सरकारी योजनेला घरी बसून अर्ज करत येतो तसेच तुमच्या गावातील हवामान अंदाज जाणून घेतो येतो. आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करा आणि हे अँप डाउनलोड करून प्रगतशील शेतकरी बना.

दरम्यान, काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकामध्ये लपवून ठेवली असल्याचे मिळून आले. त्याच्याकडे अंमली पदार्थ अफुचा एकुण 277200/-रूपयेचा माल मिळून आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल वैभव सावंत यांनी दिली. यानंतर सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .पुढील तपास महिला पीएसआय एसएन पवार करीत आहेत.

error: Content is protected !!