हॅलो कृषी ऑनलाईन (satara news) : पाण्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. त्यातल्या त्यात शेती व्यवसायात पाण्याशिवाय शेती व्यवसायाचं पान हालत नाही. सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वाकुर्डे पाणी उपसा योजना अंतर्गत या जिल्ह्यातील दोन गावात पाणी खेळतं राहत होतं. मात्र ही योजना बंद झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील काही गावात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
८०० रुपये खर्च करून ही योजना आणण्यात आली. पाणीपट्टी थकबाकी वसूल करण्यासाठी कर्मचारी नेमले नसून याचा विपरीत परिणाम या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांवर होताना दिसतो. सातारा जिल्ह्यातील कराड आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना १९९८ सालात अंमलात आणली. त्यावेळी या योजनेला ११० कोटी अनुदान देण्यात आले. आता हाच खर्च ८०० कोटी एवढा गेला आहे.
कराड तालुक्याच्या दक्षिणेकडील भागातील गावांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती पहायला मिळते. याच भागातील दक्षिणेकडील मांड नदी ही उन्हाळ्यामुळे कोरडी पहायला मिळते. यामुळे याचा फटका आता कराडमधील काही गावांना पडला आहे. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही योजना चालली नाही. एकही कामगार योजनेवर कार्यरत नाही. पाच ते सहा लाख एवढी पाणीपट्टी थकली असून ही योजना बंद केल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. Satara News
तर शेतकरी आंदोलन करतील –
योजनेचे पाणी दोन वर्षे झालं थकीत आहे. शेतकरी थकीत पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत. मात्र वसुली करणारी यंत्रणा जाग्यावर स्थिर नाही. यामुळे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून लोकप्रिनिधींचे पूर्ण दुर्लक्ष आहे. यामुळे आता शेतकरी आंदोलन करतील. असे केंद्रीय अध्यक्ष बळीराजा संघटना, पंजाबराव पाटील यांनी भाकीत केलं आहे.