Satara News : जिल्ह्यात युरिया खतांचा तुटवडा? शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड (Satara News) : कराड पाटण तालुक्यात ऐन रब्बी हंगामात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून रब्बीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अति व वादळी पावसामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया गेल्यामुळे शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आले आहेत. असे असताना खरीपातील नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. मात्र ही आशाही आता पूर्णत: मावळताना दिसत आहे. जानेवारीमध्येच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी दुकानामध्ये युरिया मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

खत कंपन्या लिंकिंग शिवाय युरिया देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळणे कठीण झाले आहे. विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना त्वरित युरिया उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. कृषी दुकानदारांकडे युरिया खत उपलब्ध असताना देखील खताचा तुटवडा दाखवून शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम घेण्यात येत आहे. याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसत असून उत्पन्नावरही परिणाम होणार आहे.

सर्वात स्वस्त किंमतीत खरेदी करा पाहिजे ते खत थेट उत्पादक कंपनीकडून

शेतकरी मित्रांनो आता आपल्याला लागणारी खते सर्वात स्वस्त किंमतीत थेट उत्पादक कंपनीकडून खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टेअरवर जाऊन Hello Krushi नावाचं मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील आणि गावाच्या जवळील सर्व खत दुकानदारांशी संपर्क करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच शेतकरी Hello Krushi अँपवरून शेती उपयोगी उत्पादने थेट उत्पादक कंपनीकडून अतिशय कमी किंमतीत खरेदी करू शकतो. तसेच सातबारा, जमीन मोजणी, बाजारभाव, सरकारी योजना, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री अशा अनेक सुविधांचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi इन्स्टॉल करून घ्या.

कृषी विभागाने लक्ष द्यावे (Satara News)

युरियाशिवाय ऊस, शाळू, गहू भाजीपाला व इतर कोणतेही पीक येऊ शकत नाही. कराड पाटण तालुक्यात युरियाचा तुटवडा आहे. दुकानांमध्ये युरिया देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कृषी दुकानांमध्ये खत मिळत नसल्यामुळे शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत. मात्र, तेथे सुद्धा खत उपलब्ध नसल्याचे दुकानदार शेतकऱ्यांना सांगत असल्याने शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे.

शेतकर्‍यांकडून आडसाल ऊस लागण फोडण्यास सुरुवात झाली आहे. ऊस पिकास खताची गरज असते. परंतु युरियासह काही मिश्र खतांचा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस पिक पिकवण्यासाठी अडचण निर्माण होऊ कृषी लागली आहे. तसेच खोडवा ऊस पिकाला सुद्धा युरियाची गरज असते. त्यामुळे युरिया मिळणे गरजेचे आहे. शेतकरी खत दुकानांमध्ये गेल्यानंतर युरिया खत मागितल्यास काही दुकानदार लिंकिंग सांगत आहेत. तर काही दुकानदार युरिया शिल्लक नसल्याचे सांगत आहेत. कराड तालुक्यातील लोक पाटण तालुक्याच्या दुकानांमध्ये युरिया घेण्यास जात आहेत. तेथे सुद्धा हीच अवस्था आहे. कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. Satara News

error: Content is protected !!