Satbara Online : जमिनीचा 7/12 उतारा, 8 अ काढण्याची सर्वात सोपी पद्धत होतेय व्हायरल; फक्त 1 मिनिटांत ही Trick वापरून करा Download

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी सातबारा उतारा (Satara Online) किती महत्वाचा आहे हे वेगळे काही सांगायला नको. मात्र तलाठी कार्यालयातून सातबाराचा उतारा मिळवायचा असेल तर तासंतास वेळ घालवावा लागतो. कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. मात्र आता तुमचा वेळ वाचणार आहे. कारण तुमच्या शेताचा सातबारा उतारा तुम्हाला मोबाईलवर अगदी सहज मिळणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सातबारा काढण्यासाठी शासकीय वेबसाईटवरही जाण्याची गरज नाही. तसेच ना मोबाईल नंबर टाकण्याची गरज आहे ना ecaptcha भरण्याची. आम्ही संगीत असलेली Trick वापरून तुम्ही १ मिनिटात हवा तो सातबारा सहज डाउनलोड करून घेऊ शकता. याकरिता तुम्हाला नक्की काय करावं लागेल हे आम्ही खाली सविस्तर सांगितले आहे.

सातबारा मिळवण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे –

१) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा.
Link : https://bit.ly/HelloKrushiApp

२) ऍप Install केल्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.

३) आता Hello Krushi ऍप ओपन करुन होम पेज वरील ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.

४) त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पुन्हा ६ विभाग मिळतील सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई -चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. इ. यापैकी सातबारा विभागावर क्लिक करा.

५) त्यानंतर आपला विभाग निवडा ( उदा कोकण, पुणे.. )

६) त्यानंतर जिल्हा निवडा (उदा. सिंधुदुर्ग, नागपूर, सातारा.. )

७)आता तालुका निवडा (उदा. कराड, कुडाळ, उमरेड..)

८)गाव निवडा (उदा. काले, वर्दे… )

९) आता तुम्हाला एक पान दिसेल ज्यात ‘७/१२’ हा पर्याय निवडा. (Satara Online)

१०) गट नंबर हा पर्याय निवडा , ‘शोधा’ या बटन वर क्लिक करा.(येथे तुम्ही केवळ आडनाव, पहिले नाव,मधले नाव ,सर्वे नम्बर /गट नंबर टाकून सुद्धा उतारा शोधु शकता)

११) आता तुम्हाला गटामधील इतर नंबर दिसतील. यातील तुमचा नंबर निवडा.

१२) आता e captcha चा पर्याय दिसेल. हॅलो कृषीवर तुम्हाला कोणताही Otp वा e captcha न टाकता सातबारा डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. App स्वत: तुमचा captcha भरेल.

१३) त्यानंतर तुमचा सातबारा दिसेल, ‘डाउनलोड करा’ या बटन वर क्लिक करून उतारा डाउनलोड करून घ्या. त्याची प्रिंट काढून घ्या.

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?

१) सातबारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र अतिशय सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात.
२) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने १ रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
३) सर्व सरकारी योजनांना मोबाइलवरूनच अर्ज करून लाभ घेता येतो.
४) आपल्या गावातील पुढील ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज समजतो.
५) आपल्या गावाजवळील सर्व खत दुकानदार यांना फोन करण्याची सोया
६) आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
७) जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
८) शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्री करता येते.
९) राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव शेतकऱ्याला स्वतःला चेक करण्याची सुविधा आहे.

error: Content is protected !!