Solar Irrigation : सोलर प्रकल्पाला 256 लाख रुपये मंजूर; राहुरी कृषी विद्यापीठात राबवला जाणार प्रोजेक्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या ३१ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या दि.२३/११/२०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत “Solar powered central pivot irrigation system (SPCPIS) for climate smart agriculture” हा प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सन २०२२- २३ ते सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राबविण्यास मान्यता प्रदान केली आहे. या प्रकल्पास राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरूपात रू. २५६.०० लाख निधी तीन वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने सन २०२२-२३ ते २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी रु २५६.०० लाख नियतवाटप मंजूर करण्यास मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार संचालक (संशोधन) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद,पुणे यांनी संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

1. राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ” Solar powered central pivot irrigation system(SPCPIS) for climate smart agriculture” हा प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी येथे राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर प्रकल्पासाठी रु.२५६.०० लाख (अक्षरी रुपये दोन कोटी छप्पन्न लाख फक्त) इतक्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर प्रकल्प केंद्र शासनाद्वारे निर्गमीत राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या ३१ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीच्या दि.२३/११/२०२२ च्या बैठकीतील मान्यतेनुसार महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राबविण्यात येईल. Solar Irrigation

4. या प्रकल्पाची अंमलबजावणी संचालक (संशोधन), महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे संनियंत्रणाखाली कृषि विभागामार्फत करण्यात यावी व संचालक (संशोधन), महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी यांनी प्रकल्पाचा आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल विहित मुदतीत केंद्र शासनाला तसेच राज्य शासनाला सादर होईल याची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे सदर योजनेतील निधी खर्चाचे लेखा परिक्षण उपयोगिता प्रमाणपत्रे राष्ट्रीय कृषि विकास योजना कक्ष, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई यांना वेळोवेळी सादर करावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३०३१३१५००५१०२०१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

error: Content is protected !!