Sonchafa Farming : सोनचाफा फुलशेतीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये; तुम्हीसुद्धा असा वेगळा प्रयोग करू शकता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Sonchafa Farming) : राज्यात हल्ली कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. हल्ली पारंपरिक शेतीऐवजी अनेक शेतकरी आधुनिक शेतीचा अवलंब करत आहेत. अशातच पुरंदर तालुक्यातील चांबळी गावातील मोहन कामठे या शेतकऱ्याने सोनचाफ्याची लागवड केली आहे. अवघ्या अर्धा एकर शेतजमिनीतून कामठे यांनी तब्बल अडीच लाखांचा वार्षिक नफा कमावला आहे. या सोनचाफ्याच्या लागवडीतून मोहन यांनी स्वतःच्या संसारास सोन्यासारखे दिवस दाखवले आहेत. सोनचाफा शेतीतून लाखो रुपयांची कमाई कामठे करत असल्याने त्यांची धडपड इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सोनचाफ्याची लागवड कशी करतात हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

यापूर्वी मोहन कामठे यांनी पारंपरिक पद्धतीने शेती केली. त्यांना यातून फारसा फायदा मिळाला नाही. काही तरी वेगळं प्रयोग यशस्वी करून दाखवण्याची इच्छा त्यांच्यात होती. एकदा त्यांच्या मामाच्या गावी गेले असताना त्यांनी सोनचाफ्याच्या शेतीची पाहिली होती. यानंतर आपणसुद्धा असं काहीतरी करून शेतीत नवीन प्रयोग करायला हवा असं त्यांना वाटले. सोनचाफ्याची शेती कशी करतात याबाबत म्हण यांनी संबंधित व्यक्तीकडून त्याबाबत माहिती मिळवली.

यानंतर कामठे यांनी सोनचाफ्याची शेती करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी रत्नागिरीहून सोनचाफ्याची रोपे आणली होती. योग्य पद्धतीने सोनचाफ्याची लागवड करून सुरवातीचे १ वर्ष त्यांना रोपांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. यातून मोहन यांना जवळजवळ अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. कामठे यांनी पारंपरिक शेती करणं बंद करून त्यांनी सोनचाफ्यातून यशस्वी उत्पादन घेतलं आहे. या शेतीमुळे त्यांच्या परिसरात सोनचाफ्याच्या फुलांची मागणी वाढू लागली आहे. Sonchafa Farming

राज्यातील कोणत्याही रोपवाटिकेमधून डिस्काउंटमध्ये रोपे खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

आता गेल्या ४ वर्षांपासून आर्थिक नफा कामठे यांना होताना दिसतोय. मात्र या शेतीसाठी फुले काढण्याकरिता मनुष्यबळाची थोडी फार आवश्यकता असते. दररोज सकाळच्या वेळी १० फुले मोजून काढावीत आणि पिशवीत ठेवावीत. यासाठी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन फुलांची तोड करावी. यामुळे मजुरांचा खर्च वाचण्यास हातभार लागतो.

सोन चाफ्याच्या शेतीचा प्रयोग या शेतकऱ्याने केल्याने तो चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे काही शेतकरी येतात सोनचाफा फुलांची शेती पाहून कामठे यांच्याकडून मार्गदर्शन मिळवतात. कामठे देखील त्यांना मार्गदर्शन देतात.

error: Content is protected !!