Agriculture News : राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला असून राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर (सरासरीच्या ८५ टक्के) पेरणी झाली आहे. तसेच १७८ तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यांत ७५ ते १०० टक्के, ५८ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलडाणा या जिल्ह्यांत अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कमी पेरणी झाली आहे. सर्वाधिक १११ टक्के पेरणी सोयाबीनची झाली असून कापसाची ९६ टक्के झाली आहे, असेही कृषी विभागाने यावेळी सांगितले आहे.
असे असले तरी राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागात पिके पाण्याखाली गेली आहे. नांदेड जिल्ह्यातील २ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली आहेत.