Soyabean Rate : सोयाबीनचे बाजारभाव वाढले; कोणत्या जिल्ह्यात काय दर मिळाला ते चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : सोयाबीन भावात मागील काही दिवसांत किंचित वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयपेंडचे भाव वाढल्याने देशातील सोयाबीनच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात सातारा जिल्ह्यातील वडूज शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सर्वाधिक 5500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. त्याखालोखाल सोलापूर, वाशीम, भोकरदन येथे सोयाबीनला ५ हजार ३०० रुपये असा रेट मिळाला आहे.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात राज्यात अकोला कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वात जास्त 4242 क्विंटल इतकी आवक नोंद झाली आहे. तसेच उदगीर येथे 4000 क्विंटल आवक झाली आहे. राज्यता सर्वसाधारण ५००० ते ५ हजार २०० प्रति क्विंटल असा सोयाबीनला दर मिळाला आहे. आम्ही खाली चार्टमध्ये आजचे सोयाबीनचे जिल्हानिहाय बाजारभाव दिले आहेत.

राज्यातील कोणत्याही बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर चेक करा

आता राज्यातील कोणत्याही बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव शेतकरी आपल्या मोबाईलवर स्वतः चेक करू शकतो. राज्यातील लाखो शेतकरी सध्या या मोफत सेवेचा लाभ घेऊन आपला शेतमाल अधिक भाव मिळत असलेल्या बाजारसमितीला पाठवून नफा कमवत आहेत. तुम्हीसुद्धा याचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या. इथे बाजारभावासोबतच जमिनीचा सातबारा उतारा, नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच कोणत्याही सरकारी योजनेला मोबाइलवरूनच अर्ज करता येतो. शिवाय सॅटेलाईटच्या मदतीने आपली शेतजमिनीची मोजणीही करता येते. आजच Hello Krushi इन्स्टॉल करून या सेवेचे लाभार्थी बना.

आगामी काळात सोयाबीनचे दर वाढणार?

जानेवारी महिन्यात सोयाबीनचे दर स्थिर राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून घरामध्येच साठवून ठेवला होता. सध्या अनेक शेतकरी सोयाबीनचे भाव वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव वाढत असल्याने देशातही आगामी काळात सोयाबीनचे दर वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/02/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल400300052705200
औरंगाबादक्विंटल7495050004975
राहूरी -वांबोरीक्विंटल14490051205000
उदगीरक्विंटल4000530053875343
लोहाक्विंटल66530154115370
राहताक्विंटल7500052015140
सोलापूरलोकलक्विंटल87466053005175
हिंगोलीलोकलक्विंटल300490053115105
वडूजपांढराक्विंटल100520055005300
जळकोटपांढराक्विंटल439470051254875
अकोलापिवळाक्विंटल4242400052355000
चिखलीपिवळाक्विंटल605450051764838
वाशीमपिवळाक्विंटल2400500052765100
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल900505053005100
उमरेडपिवळाक्विंटल2842440053505200
भोकरदन पिवळाक्विंटल35510053005250
भोकरपिवळाक्विंटल35505051695110
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल307480052005000
जामखेडपिवळाक्विंटल109450051004800
गेवराईपिवळाक्विंटल59400050004600
देउळगाव राजापिवळाक्विंटल45450051505000
वरोरापिवळाक्विंटल27450050504800
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल40475050754850
अहमहपूरपिवळाक्विंटल1800500053305115
औराद शहाजानीपिवळाक्विंटल193525053305290
मुरुमपिवळाक्विंटल330460052854942
उमरखेडपिवळाक्विंटल160500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल330500052005100
सिंदीपिवळाक्विंटल129468051655055
error: Content is protected !!