Soyabean Rate : सोयाबीनचे बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात वाढणार? शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Rate) हे पीक शेतकऱ्यांसाठी कमी वेळेत अधिक नफा देणारे पीक म्हणून पाहिले जाते. सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन नेहमीच फायदेशीर ठरते. सध्या सोयाबीन अन सोयपेंड यांना जागतिक बाजारपेठेत चांगला दर मिळतो आहे. सोयाबीन तेलाचे (Soyabean Oil) भावही सध्या वाढलेले आहेत. मात्र असे असताना सोयाबीनचे बाजारभाव मात्र कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मागील वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. मात्र यंदाच्या वर्षी सोयाबीनला सरासरी 5000 रुपये क्विंटल असा भाव मिळतो आहे. येणाऱ्या दिवसांत सोयाबीनचे दर वाढतील का? सोयाबीनच्या कमी बाजारभावामागील कारण काय आहे याबाबत आपण या अपडेट मध्ये थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

असे चेक करा रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या शेतमालाचे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

अर्जेन्टिनामधील काही भागात मागील काही दिवस पाऊस झाला. त्यामुळे तेथील सोयाबीनचे दर कमी झाले होते. मात्र आज पुन्हा सोयाबीनचा दर स्थिर होत १५.२४ डॉलर म्हणजेच ४५६२ रुपये इतके झाले आहेत. तसेच सोयपेंडचे दर ४७८ डॉलरवर प्रति टनवर पोहोचले आहेत. मात्र भारतात सोयाबीनचे दर स्थिर राहिले आहेत. एरवी आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारांप्रमाणे सोयाबीनचे दर कमी जास्त होत असतात. परंतु सध्या देशातील सोयाबीन दर स्थिर असून ५००० रुपये क्विंटल असा सरासरी भाव सोयाबीनला मिळतो आहे.

देशात सोयाबीन तेलाचा साठा?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल अन पामतेलाचे दर कमी झाले आहेत. सरकारने तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने देशात मोठ्या प्रमाणात आयात झाली आहे. भारतात सोयपेंडला मागणी असल्याने सोयातेलाचे गाळपही वाढले आहे. यामुळे देशात सोयातेलाचा साठा निर्माण झाला आहे. देशात सोयातेलाचा साठा वाढल्याने सध्या तेलाचे दर कमी असल्याचे बोलले जात आहे.

फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचे दर वाढणार? (Soyabean Rate)

सरकारने येणाऱ्या दिवसांत आयातशुल्क वाढवल्यास तेलाचे दर वाढतील असे सांगण्यात येत आहे. जर असे झाले तर वाढलेल्या किमतींचा फायदा मिळावा म्हणून व्यापारी वर्गाकडून तेल साठवून ठेवण्यात येत असल्याचंही बोललं जात आहे. तसेच आर्थिक अधिवेशनात कर रचनेतही मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे या काळात मोठे व्यवहार सहसा होत नाहीत. याचाही परिणाम सोयाबीन दारांवर जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सोयाबीनच्या दारात मोठे बदल होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच देशातील खाद्यतेलाची दरही कमी झालेत. त्यामुळे आयात कमी होऊ शकते. सोयाबीन तेलाची आयात कमी झाली तर देशातील सोयाबीन तेलाचा खप वाढेल. यामुळे सोयाबीन तेल निर्माते सोयाबीन तेलाचे उत्पादन सुरूच ठेवतील. परिणामी येणाऱ्या काळात सोयाबीनची मागणी राहील. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर वाढतच राहतील अशी स्थिती आहे. यामुळे येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर वाढतील असे सोयाबीन अभ्यासकांचे म्हणणे आहे

सोयाबीनचे सध्याचे दर खालीलप्रमाणे आहेत –

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/01/2023
तुळजापूरक्विंटल80500052005100
पैठणपिवळाक्विंटल1190019001900
भोकरदन पिवळाक्विंटल44521053505300
वरोरापिवळाक्विंटल62490050805000
उमरगापिवळाक्विंटल10300050054900
उमरखेडपिवळाक्विंटल120525054005350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70525054005350
27/01/2023
येवलाक्विंटल23485051575051
लासलगावक्विंटल615300053515275
लासलगाव – विंचूरक्विंटल650300052505100
जळगावक्विंटल8515051505150
शहादाक्विंटल83510152695188
बार्शीक्विंटल1151450051505100
माजलगावक्विंटल807450051515050
नंदूरबारक्विंटल65482551484925
राहूरी -वांबोरीक्विंटल16450051004800
पाचोराक्विंटल90495051385051
उदगीरक्विंटल5100522053365278
कारंजाक्विंटल4000504552455195
श्रीरामपूरक्विंटल37500051515075
लासूर स्टेशनक्विंटल43450049254700
शिरुरक्विंटल15480050004900
कन्न्डक्विंटल4450050004800
तुळजापूरक्विंटल85500052005100
राहताक्विंटल51470051695100
धुळेहायब्रीडक्विंटल22350049004900
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल268518054075350
गंगापूरहायब्रीडक्विंटल13470149504869
सोलापूरलोकलक्विंटल111450051654955
अमरावतीलोकलक्विंटल4614495051005025
नागपूरलोकलक्विंटल567440151604970
अमळनेरलोकलक्विंटल25500051515151
चांदवडलोकलक्विंटल3490050004950
मनमाडलोकलक्विंटल8506052085135
हिंगोलीलोकलक्विंटल455460051684884
कोपरगावलोकलक्विंटल360450052205076
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल30375151404176
मेहकरलोकलक्विंटल1220430052004800
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल411340052765250
जळकोटपांढराक्विंटल139470052004950
बारामतीपिवळाक्विंटल140440052005170
लातूरपिवळाक्विंटल14830500053505250
धर्माबादपिवळाक्विंटल640506552405150
जालनापिवळाक्विंटल2178400051515050
अकोलापिवळाक्विंटल3448400051954900
परभणीपिवळाक्विंटल400500051505050
आर्वीपिवळाक्विंटल155450052255050
चिखलीपिवळाक्विंटल1582472551754950
हिंगणघाटपिवळाक्विंटल2526450052354920
बीडपिवळाक्विंटल150490052005065
वाशीमपिवळाक्विंटल3000475052005000
पैठणपिवळाक्विंटल1470047004700
वर्धापिवळाक्विंटल67487552305050
भोकरपिवळाक्विंटल50404951654607
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल396480051004950
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1200487551955015
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल39480051005000
खामगावपिवळाक्विंटल5359460051504875
मलकापूरपिवळाक्विंटल395478051205050
वणीपिवळाक्विंटल449505051805100
सावनेरपिवळाक्विंटल35457549884800
जामखेडपिवळाक्विंटल73450050004750
गेवराईपिवळाक्विंटल79460050254810
परतूरपिवळाक्विंटल40510051515127
गंगाखेडपिवळाक्विंटल20530054005300
चांदूर बझारपिवळाक्विंटल87450050814750
देउळगाव राजापिवळाक्विंटल25400150704500
नांदगावपिवळाक्विंटल10280051805001
आंबेजोबाईपिवळाक्विंटल330430052005060
केजपिवळाक्विंटल225500052005111
मंठापिवळाक्विंटल19430051505000
अहमहपूरपिवळाक्विंटल1200500052515251
चाकूरपिवळाक्विंटल196510052755202
कळंब (उस्मानाबाद)पिवळाक्विंटल503450052005000
उमरगापिवळाक्विंटल34455151505050
सेनगावपिवळाक्विंटल510460051005000
पालमपिवळाक्विंटल32490051004950
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2955480064255350
उमरखेडपिवळाक्विंटल70515054005350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल100515054005350
काटोलपिवळाक्विंटल55481150214950
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल205465851204975
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल789510052355200
error: Content is protected !!