हॅलो कृषी ऑनलाईन । (Soyabean Variety) सोयाबीन हे अधिक नफा मिळवून देणारे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीनपासून सोयफूड, सोयातेल बनवले जाते. तसेच सोयपेंड पशुधनासाठी पौष्टीक खाद्यही मानले जाते. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते. अलीकडच्या काळात सोयाबीनच्या अनेक नवीन जातीही (Soyabean Vaan) निर्माण करण्यात आल्या आहेत. सध्या सोयाबीनचे बाजारभाव घसरलेले असले तरी भविष्यात सोयाबीनला मागणी वाढतच राहणार आहे. महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल ५००० रुपये असा भाव मिळतो आहे. फेब्रुवारी महिन्यांमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होईल असे सांगितले जात आहे. आपल्याकडे अनेक शेतकरी उन्हाळी सोयाबीन लागवडही करतात. तेव्हा आज आपण सोयाबीनच्या काही प्रमुख वाणांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
अशी खरेदी करा कमी किंमतीत दर्जेदार बियाणे अन रोपे
शेतकरी मित्रांनो आता दर्जेदार बियाणे अन रोपे कमी किमतीत उपलब्ध होणे शक्य झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपवर शेतकऱ्याला त्याच्या जवळच्या सर्व रोपवाटिका मालकांशी सहज संपर्क करण्याची सुविधा आहे. शिवाय या अँपवर थेट विक्रेत्याकडून शेतकऱ्याला सेवा पुरवली जात असल्याने मोठा डिस्काउंट मिळतो आहे. शेतकरी सुद्धा आपले बियाणे या अँपवरून थेट विक्री करत आहेत. यासोबत Hello Krushi अँपवर रोजचा बाजारभावहि चेक करता येतो. सतसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा डाउनलोड करता येतो. आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.
सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.
१) जे एस 93 -05 : हे सोयाबीनचे वाण कमी कालावधीत परिपक्व होणारे असून या वाणाचा फुलावर येण्याचा कालावधी 35 ते 37 दिवस असून परिपक्वता कालावधी 90 ते 95 दिवस एवढा आहे. फुलाचा रंग जांभळा असून 100 दाण्यांचे वजन 11 ते 12 ग्रॅम असत. या वाणात तेलाचा उतारा 18 ते 19 टक्के असून हेक्टरी उत्पादकता ते 20 ते 24 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. तुलनात्मकदृष्ट्या हा वाण कीड रोग प्रतिकारक्षम आहे.
२) जे एस 95 – 60 : हा सोयाबीन चा जांभळ्या रंगाची फुले असणारा वान कमी कालावधीत परिपक्व होणारा असून साधारणता 32 ते 34 दिवसात फुलात येतो व 82 ते 88 दिवसात परिपक्व होतो. या वाणाच्या 100 दाण्याचे वजन 12 ते 13 ग्रॅम असून तेलाचा उतारा 18.5 ते 19 टक्के एवढा तर हेक्टरी उत्पादकता 18 ते 20 क्विंटल प्रति प्रति हेक्टर एवढी आहे.
३) एम ए यु एस – 158 : हा सोयाबीन चा जांभळी फुलं असणारा वाण साधारणत 38 ते 42 दिवसात फुलात येतो व 95 ते 98 दिवसात परिपक्व होतो. या या वाणाचे 100 दाण्याचे वजन दहा ते बारा ग्रॅम एवढे असून तेलाचा उतारा 19 ते 19.5 टक्के तर हेक्टरी उत्पादकता 26 ते 31 क्विंटल पर्यंत येऊ शकते. तुलनात्मक दृष्ट्या या या वानाचा दाना टपोरा असून शेंगा पक्व झाल्यानंतर दहा ते बारा दिवस या वाणाच्या शेंगा फुटत नाही. हां वाण खोडमाशी साठी सहनशील व आंतर पिकासाठी योग्य आहे. Soyabean Variety
(४) एम ए यु एस – 162 : शेतकरी बंधुंनो सोयाबीनचा जांभळी फुले असणारा वाण 41 ते 44 दिवसात फुलावर येतो तर शंभर ते एकशे तीन दिवसात परिपक्व होतो. या सोयाबीनच्या कोणाचे 100 दाण्याचे वजन अकरा ते तेरा ग्राम एवढे असून तेलाचा उतारा 19.5 20 टक्के एवढा असतो व हेक्टरी उत्पादकता ते 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. शेतकरी बंधुंनो या वानाला शेंगा झाडाला जमिनीपासून तुलनात्मक दृष्ट्या अधिक उंचीवर लागत असल्यामुळे हा वाण यंत्राद्वारे काढणीसाठी म्हणजेच मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी उत्तम आहे तसेच या वाणाच्या शेंगा परिपक्वते नंतर दहा ते बारा दिवस फुटत नाहीत.
(५) एम ए यु एस 612 : हे सोयाबीन वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेले असून या वानाचा परिपक्वता कालावधी 93 ते 98 दिवस असून हा वाण कमी ओलाव्यास व शेंगा तडकणे संदर्भात सहनशील म्हणून शिफारशीत आहे. सोयाबीन वरील विविध रोग व किडीसाठी सुद्धा तुलनात्मकदृष्ट्या प्रतिकारक्षम म्हणून हा वाण शिफारशीत असून मशीन द्वारे काढणीसाठी योग्य आहे.
(६) ए एम एस – 1001 ( पीडीकेव्ही येलो गोल्ड) : डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 2018 साली प्रसारित केलेला जांभळ्या रंगाची फुले असलेला 38 ते 40 दिवसात फुलात येणार व 95 ते 100 दिवसात परिपक्व होणारा तसेच हेक्टरी 22 ते 26 क्विंटल उत्पादकता देणारा हा वाण असून तेलाचा उतारा या या वनात 19 ते 19.5 टक्के एवढा असतो तर 100 दाण्याचे वजन 10.5 ते अकरा ग्रॅम एवढे असते.
(७) एएमएस एमबी -5 -18 ( सुवर्ण सोया ) : हा वाण 2019 या वर्षात प्रसारित केलेला असून या सोयाबीनच्या वाणाचा फुलाचा रंग पांढरा असून या वाहनाचा फुलात येण्याचा कालावधी 40 ते 42 दिवस व परिपक्वता कालावधी 98 ते 102 दिवस आहे या वाणाचे 100 दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम तेलाचा उतारा 19.5 ते ते 20 टक्के एवढा आहे तर हेक्टरी उत्पादकता ते 28 क्विंटल प्रति हेक्टर एवढी मिळू शकते.
(८) फुले संगम (के डी एस 726) (Fule Sangam vaan) : हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2016 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या भागाकरिता शिफारशीत केलेला सोयाबीनचा वान आहे. हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडणारा वाण म्हणून शिफारशीत असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 100 ते 105 दिवस आहे. हा वाण पानावरील ठिपके आणि खोडमाशी सुद्धा तुलनात्मक दृष्ट्या प्रतिकारक असून या वाणाची हेक्टरी उत्पादकता 23 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर एवढी नमूद केली असून या वानाचा तेलाचा उतारा 18. 42 टक्के एवढा आहे.
९) फुले किमया (के डी एस 753) : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण सन 2017 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व इतर काही राज्याकरिता शिफारशीत केला असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस असून हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडतो म्हणून शिफारशीत आहे. या वानात तेलाचा उतारा 18.25 % एवढा असून या वाणाची हेक्टरी उत्पादकता 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढी नमूद केली आहे.
(१०) सोयाबीन के. एस. 103 : शेतकरी बंधूंनो हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2018साली दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना तामिळनाडू आंध्र प्रदेश व इतर काही राज्यासाठी प्रसारित केला असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस एवढा आहे. हा वाण तांबेरा रोगास व व सोयाबीन वरील विविध कीड व रोगास तुलनात्मक दृष्ट्या प्रतिकारक असून रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणारा न लोळणारा म्हणून त्याची गुणवैशिष्ट्ये नमूद केली आहे. या वाणाची हेक्टरी उत्पादकता 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढी नमूद केली असून तेलाचा उतारा जवळपास 18.10 टक्के एवढा असतो.
भारतातील सोयाबीनच्या Top 10 जाती (Soyabean Variety) –
- जेएस 335
- जेएस 20
- जेएस 95-60
- जेएस 95-05
- जेएस 335-05
- जेएस 922
- जेएस 20-05
- जेएस 97-60
- जेएस 95-10
- 10.जेएस 20-10