Success Story : लग्न ठरेना, Ded करून नोकरी मिळेना; शेवटी दुग्धव्यसाय सुरु केला, आता महिन्याला कमावतो लाखो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Beed News) : भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र या देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे. काही शिक्षित तरुण नोकरीच्या शोधात असतात. मात्र नोकरी न मिळाल्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. असाच एक बीड जिल्ह्यातील तरुण चंद्रसेन पारखे या युवकाने डी. एडचे (D.ed) शिक्षण घेतलं होतं. मात्र नोकरी मिळाली नाही. यामुळे त्याने दुग्धव्यवसायास सुरुवात केली. यातून तो एखाद्या नोकरदारापेक्षा अधिक पैसे कमावत आहे. (Success Story)

जनावरांची खरेदी विक्री online करण्यासाठी इथे क्लिक करा

सुरुवातील नोकरी मिळत नसल्याने चंद्रसेन पारखे यांनी दूध व्यवसायात प्रवेश करताना सुरुवातीला ६ म्हशी विकत घेतल्या. एकूण उत्पन्नातून ३० ते ४० लिटर दूध विकले जायचे. या व्यवसायात चांगली कमाई करता येईल हा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी आणखी ६ म्हशी विकत घेतल्या आणि हा व्यवसाय वाढवला. सध्या त्यांची महिन्याची कमाई ५० हजार आहे. वर्षाला ते लाखो रुपये दूध व्यवसायातून कमवत आहेत.

तुमच्या व्यवसायाचे Online मार्केटिंग करण्यासाठी हे काम करा

तुम्हीसुद्धा एखादा शेतीनिगडीत वा अन्य व्यवसाय करत असाल तर ऑनलाईन मार्केटिंग हि तुमच्यासमोर समस्या असेल. मात्र आता तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं ऑनलाईन मार्केटिंग विना पैसे करता येणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये शेतकरी दुकान या विभागात तुम्हाला तुमच्या दुकानाची वा वस्तूची मोफत जाहिरात पोस्ट करता येते. आजपर्यंत अनेकांनी हॅलो कृषी अँप वरून आपला व्यवसाय वाढवला आहे. तुम्हीसुद्धा आजच याचा मोफत लाभ घ्या.

आज चंद्रसेन यांच्याकडे सात गाई आणि आठ म्हशी आहेत. त्याचप्रमाणे लहान – मोठया जनावरांचा समावेश केला तर साधारणपणे ३२ जनावरे आहेत. गाईचे १०० तर म्हशीचे ५० लिटर दूध उत्पादन मिळते. सद्या बाजारात ३५ रुपये लिटर दुधाचे भाव असून या म्हशीच्या दुधाला ४० ते ५० रुपये लिटरचा अधिक भाव मिळतो. यातून एकूण दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, त्यात सर्व खर्च निघून ४० ते ५० हजाराचा नफा पहायला मिळतो. (Dairy Farming)

सुरुवातीला चंद्रसेन पारखे यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्यांच्या दोन भावंडांनी देखील यामध्ये त्यांना मदत करायला सुरुवात केली. जनावरांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन केलं. दुग्धवाढीसाठी हिरवा चारा, गोरी पेंड, मका यासारखा खुराक दुभत्या जनावरांना दिवसातून दोन वेळा दिला जातो. पारखे यांच्याकडे कोरडवाहू शेती असल्याने हिरवा चारा त्यांना विकत घ्यावा लागतो. तर कमी पैशात मूरघास देखील तयार करता येते. त्यामुळे जनावरांना बाराही महिने चारा उपलब्ध होतो. हा व्यवसाय वाढवण्यासाठी तिघेही भावंड वेळ मिळेल तसे काम करत असतात. चंद्रसेनला डोळ्यापुढे आदर्श व्यक्ती ठेऊन बीड तालुक्यात अनेकजण दुग्धव्यवसाय करू लागले आहेत. Success Story

बीड तालुक्यातील तरुणांचा दुग्ध व्यवसायाकडे कल

बीड तालुक्यातील अनेक तरुणही दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. शेती बरोबरच त्याला पूरक असलेल्या दुग्ध व्यवसायाचे योग्य नियोजन केले तर त्यातूनही चांगले पैसे मिळू शकतात. त्यामुळं बीड जिल्ह्यातील अनेक तरुण शेतकरी आता या दुग्धव्यवसायाकडे वळत आहेत.

error: Content is protected !!