Success Story : तरुण शेतकऱ्याला टरबुजाने केलं मालामाल, लाखों रुपयांचा मिळतोय नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Success Story) : नाशिक जिल्हा हा शेती व्यवसायासाठी प्रगतशील आणि गतिशील म्हणून ओळखला जातो. यामुळे या ठिकाणी अधिक लोकं द्राक्षे आणि कांद्याचे पीक घेत आहेत. मात्र यंदा कांद्याच्या दराची चेष्टा झाली आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही. यामुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. गुंतवणूक केलेले पैसे देखील निघतील की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नाशिक जिल्ह्यातील रायपूर गावातील शंकर कोल्हे यांनी कांद्याच्या पिकाला वगळून टरबूजाचे पीक लावले आहे. यासाठी त्यांनी ४ एकरात टरबूजाचे पीक घेऊन अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली. सध्या उन्हाळा ऋतू असल्याने बाजारात विक्रीसाठी आलेला ३२ टनहून अधिक टरबूज व्यापाऱ्यांनी खरेदी केला. त्याची विक्री अजूनही सुरूच आहे. यातून शंकर कोल्हे यांना लाखो रुपयांच्या घरात नफा मिळाला आहे.

सहा लाख रुपयांचा नफा

महाराष्ट्र राज्यासह, जम्मू, गुजरात या बाजार समितीमध्ये टरबूजाची विक्री झाली. त्यावेळी गुंतवलेले पैसे वगळता सहा ते सात लाखांपर्यंत उत्पन्न लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळणार आहे. कांद्यामुळे शेतकरी तोट्यात गेला. परंतु टरबूजाने शेतकऱ्याला नफ्याचे दिवस दाखवले. यामुळे शेतकरी सध्या समाधानात आहे.

शेतकऱ्याला समाधान

कांद्यामुळे शेतकरी तोट्यात गेला. यामुळे शेतकऱ्याला कांद्याचा खर्च देखील निघत नाही. यामुळे रायपूर येथे शंकर कोल्हे या शेतकऱ्याला यशस्वीरित्या टरबूज या शेतमालाची किमया साधली आहे. त्यांना त्याचे समाधान आहे. कांद्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यामुळे आता शेतकरी कांदा या पिकाला पर्यायी पीक म्हणून इतर पिकांची लागवड करत आहेत. यामुळे शेतकरी कांद्याच्या झालेल्या तोट्याची सर्व कसर भरून काढत आहेत.

error: Content is protected !!