Sugar Export Policy : साखर निर्यातीबाबत सरकार घेणार मोठा निर्णय; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा कि व्यापाऱ्यांना?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । (Sugar Production In India) साखर उत्पादनात भारत जगात एक अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो. मागील वर्षात भारताने रेकॉर्डब्रेक साखरेचे उत्पादन (Sugar Production) घेतले आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने कोटा निश्चित करून साखर निर्यातीवर बंदी (Sugar Export Policy) घातली होती. मात्र आता हि बंदी सरकार उठवणार असल्याचे समजत आहे. व्यापारी वर्गाच्या मागणीमुळे सरकार हा निर्णय घेऊ शकते मात्र यामुळे शेतकऱयांना काहीही फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे. साखर निर्यात झाली म्हणून कारखाने ऊसाला अधिक एफआरपी (FRP) देणार का हा प्रश्न आहे. तसेच चालू वर्षी साखरेचे उत्पादन ६-७ टाक्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण इथेनॉल निर्मितीसाठीही ऊसाची आवक होत असल्याने त्याचा साखर उत्पादनावर परिणाम होणार आहे.

साखर निर्यातीचा कोटा वाढविण्याबाबत पुढील महिन्यात निर्णय?

साखरेच्या निर्यात कोट्याबाबत वरिष्ठ पातळीवर मंथन सुरू असल्याचे बोलले जात आहे. पुढील महिन्यात केंद्र सरकार साखर निर्यातीचा कोटा वाढवण्याबाबत निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. साखर व्यवसायाशी निगडित व्यापारी अनेक दिवसांपासून निर्यात कोटा वाढवण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. ही मागणी मान्य झाल्यास त्यांच्यासाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

Import/Export ची माहिती शेतकऱयांना येथे मिळेल

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचा शेतमाल परदेशात निर्यात (Export) करायचा असेल तर Hello Krushi हे मोबाईल अँप त्यासाठी उत्तम पर्याय आहे. आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा अन शेतीविषयक सर्व समस्यांचे एकाच ठिकाणी उत्तर मिळवा. इथे तुम्हाला सातबारा, नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने मोजता येते. रोजचा बाजारभाव स्वतः चेक करता येतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपवरून करता येते.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा कि व्यापाऱ्यांना?

सध्या 61 लाख टन साखर निर्यातीस मान्यता देण्यात आली आहे. परदेशात जाण्यासाठी 12 लाख टन साखर बंदरात पडून आहे. 31 मेपर्यंत सुमारे 43 लाख टन साखर निर्यात होणार आहे. साखर निर्यातीच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळणार आहे. मात्र थेट बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत याचा फायदा पोहोचणे अवघड आहे.

देशातील साखर उत्पादन वाढले

मागील वर्षी (2021 – 22) कारखान्यांनी सुमारे 112 लाख टन साखर निर्यात केली होती. आतापर्यंतची हि सर्वाधिक निर्यात असल्याचं बोललं जात आहे. ISMA ने एका निवेदनात म्हटले आहे की, चालू विपणन वर्षात 15 जानेवारी 2023 पर्यंत, साखरेचे उत्पादन 156.8 लाख टन झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 150.8 लाख टन होते.

error: Content is protected !!