Sugar Production : साखर उत्पादनात महाराष्ट्र ठरला किंग; तब्बल इतके टन उत्पादक घेत UP ला टाकले मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी साखरेचे उत्पादन (Sugar Production) वाढले आहे. उत्तर प्रदेश साखर उत्पादनात अव्वल होते. मात्र यावेळी महाराष्ट्रा UP ला मागे टाकत साखर उत्पादनात किंग बनले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अहवालानुसार, चालू ऊस हंगामात (ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023) 15 जानेवारीपर्यंत 156.8 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 150.8 लाख टन होते.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी 58.87 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, तर यावर्षी ते 60.3 लाख टन झाले आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांमध्येही साखर उत्पादनात वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी यूपीच्या साखर कारखान्यांमधून 40.2 लाख टन उत्पादन मिळाले होते, तर यावर्षी 40.7 लाख टन उत्पादन नोंदवले गेले आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक साखर उत्पादक राज्य ठरले आहे. राज्यात गेल्या वर्षी 138 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. जे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च आहे. तथापि, 2022-23 मध्ये उत्पादन 129 लाख टनांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे, असे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

चालू वर्षी (2022-23) साखरेचे उत्पादन 6-7 % नी कमी होण्याची शक्यता

देशातील साखरेचे उत्पादन ६-७ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता नोंदवण्यात आली आहे. अनियमित मान्सूनमुळे ऊस पिकाला मोठा फटका बसत असून यंदाच्या चालू वर्षी याचा ऊस उत्पादनावर परिणाम दिसून येणार आहे. तसेच देशात सध्या ऊसापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरु असल्याने तिकडेही उसाची आवक जात असल्याने याचा साखर उत्पादनावर परिणाम होणार आहे.

या राज्यांमध्येही साखरेचे मोठे उत्पादन (Sugar Production)

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अहवालानुसार, महाराष्ट्राने 2021-22 या वर्षात 137.2 लाख टन साखरेचे उत्पादन नोंदवले आहे आणि यासह महाराष्ट्र देशातील सर्वात मोठा साखर उत्पादक बनला आहे, परंतु उत्तर प्रदेश देखील दुसऱ्या स्थानावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर कर्नाटक आहे. गेल्या वर्षी कर्नाटक येथे साखर कारखान्यांनी ३३.६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तामिळनाडूमध्ये साखरेचे उत्पादन २.१ लाख टनांवरून ३.६ लाख टन झाले आहे, तर गुजरातमध्येही ४.६ च्या तुलनेत ४.८ लाख टनांचे उत्पादन झाले आहे.

error: Content is protected !!