Sugarcane : ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे आंदोलन सुरूच, राजू शेट्टिंचा आंदोलनाला पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यातील ऊस तोडणी मशिन संघटनेचे आंदोलन सुरू आहे. ऊस तोडणी अनुदानाच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन सुरू असलेले पहायला मिळत आहे. राज्यातील ९०० हून अधिक ऊस तोडणी (Sugarcane Harvester) मशिनधारकांनी आंदोलनास सुरुवात केली. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे याकडे लक्ष लागलं आहे.

अनुदान न मिळाल्याने आंदोलक आर्थिक अडचणीत आले आहेत. या मशीन धारकांच्या मागण्या लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच ऊस तोडणी ही सातशे रुपये करावी. मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा. अशी मागणी करण्यात येत आहेत. या आंदोलनासाठी उदयनराजेंसह इतर मंत्र्यांनी देखील पाठिंबा दिला.

उदयनराजे भोसलेंचा आंदोलनास पाठिंबा

महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेतर्फे आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला असून या आंदोलनाला उदयनराजे भोसले यांनी देखील पाठिंबा दिला आहे. तसेच या आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच सहकार मंत्री अतुल सावे आणि सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले असून यावर आता कोणत्या उपाययोजना किंवा निर्णय घेतला जाईल. हे पाहणं उत्सुकतेचं राहील. यावर आता राजू शेट्टींनी आपलं मत व्यक्त केलं आहे. (Sugar)

काय म्हणाले राजू शेट्टी?

गेली अनेक वर्षे ऊसतोड कामगार आणि मशीन मालकांना समस्या भेडसावत आहेत. यामुळे त्यांना आर्थिक फटका बर असून सरकारने याकडे लक्ष द्यावे. असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे.

error: Content is protected !!