Sugarcane : ऊसाच्या 1 टनापासून मिळवा 25 हजार उत्पन्न; साखर नाही तर ‘हा’ आहे नवा पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या ऊस उत्पादक शेतकरी उसाला मिळत असलेल्या कमी दरामुळे द्विधा मनस्थितीत आहेत. ऊसाला दुसरा कोणता पर्याय असू शकतो याबाबत सध्या शेतकरी चर्चा करत आहेत. खासकरून पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कमी शेतीचे क्षेत्र आणि इतर व्यवसाय वा नोकरी असलेने शेतकऱ्यांना ऊस शेती जवळची वाटत आहे. उसाला इतर पिकांप्रमाणे जास्त वेळ द्यावा लागत नसल्याने अनेक शेतकरी आपापला इतर व्यवसाय, नोकरी सांभाळून शेती करताना दिसतात. मात्र अलीकडच्या काही दिवसांत उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने आता ऊस शेती फायद्याची वाटत नाहीये. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती देणार आहोत ज्याच्यामदतीने तुम्ही १ टन उसातून २५ हजार उत्पन्न कमावू शकता.

उसातून एकरी १०० टन ऊस काढायचाय?

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी Hello Krushi मोबाईल अँपच्या मदतीने एकरी ऐंशी ते शंभर टन ऊस उत्पादन काढत आहेत. तुम्हीसुद्धा आजच गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप आजच डाउनलोड करून घ्या. इथे १ रुपयाही न भरता शेतकऱयांना शेतीविषयक माहिती, रोपांची खरेदी करण्याची सुविधा तसेच प्रक्रिया उद्योग उभारण्याचे मार्गदर्शन मोफतमध्ये केले जाते. यासोबत सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज शेतकरी या अँपच्या मदतीने स्वतः चेक करू शकतो. तेव्हा आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचे लाभार्थी .

शेतकरी मित्रांनो शेतकरी एखादे शेतीचे उत्पादन जास्त मिळाले की ते बाजरात विकण्यालाच जास्त प्राधान्य देतात. काही वेळेला मात्र या शेतीमालाला म्हणावा तसा दर मिळत नाही. नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी दरात माल विकावा लागतो. मात्र अशावेळी ‘कृषी प्रक्रिया ‘ हा चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. फळांपासून ज्यूस ,जॅम , जेली, लोणची असे अनेक पदार्थ करून बाजारात विकले जातात. त्याचप्रमाणे आता उसाची केवळ साखर न बनवता त्यापासून जाम बनवून विकता येते. आज आपण ‘केन जाम’ निर्मिती बाबत माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर (तमिळनाडू) येथील ऊस पैदास केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जी. एस. यांनी उसाच्या रसाचे मूल्यवर्धन करून देशात पहिल्यांदाच ‘केन जाम’ निर्मिती केली आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मागील वर्षी झालेल्या ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या विकसित उत्पादनाचे अनावरण करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा यांनी सांगितले की ,फळांचे गर आणि साखर यांचे समप्रमाणात मिश्रण करून बाजारात विविध प्रकारच्या व चवीचे जाम उपलब्ध आहेत. मात्र या उत्पादनात उसाच्या रसाचा पूर्णपणे वापर करून साखर न मिसळता हे उत्पादन विकसित केले आहे.

एक टन उसापासून मिळते २५ हजारांचे उत्पन्न (Sugarcane)

पुढे माहिती देताना तंत्रज्ञानाचे विकासक डॉ. सुरेश यांनी सांगितले की,उसापासून तयार करण्यात आलेल्या जाममध्ये जीवनसत्त्वे व्यतिरिक्त पोटॅशिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम यांसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. जाम उत्पादनाच्या उद्देशाने गाळप केलेल्या एक टन उसापासून ऊस उत्पादकांना सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

काय आहेत या जॅमची वैशिष्ट्ये (Sugarcane Jam)

–उसाच्या रसाची पौष्टिकता आणि चव टिकवून ठेवली आहे.
–यामध्ये फळांच्या विविध चवींचे घटक मिसळता येतात.
–हे उत्पादन विकसित करताना अननस, चेरी, चॉकलेट, आले-लिंबू, आले व दालचिनी या चवीचे जाम तयार करण्यात आले आहेत.
–हा जाम ब्रेड, चपाती, इडली, डोसा आणि केक यांसारख्या खाद्यपदार्थांसह वापरला जाऊ शकतो.
–जाममध्ये जीवनसत्त्वे व्यतिरिक्त पोटॅशिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम यांसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
–या उत्पादनात उसाच्या रसाचा पूर्णपणे वापर करून साखर न मिसळता हे उत्पादन विकसित केले आहे.

व्यावसायिक उत्पादनासाठी कुठे कराल संपर्क ?
उसापासून जॅम बनवण्याचे हे तंत्रज्ञान महाराष्ट्र आणि तमिळनाडू राज्यातील दोन कंपन्यांना व्यावसायिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा परवाना हस्तांतरित करण्यात आला आहे. अन्नप्रक्रिया उद्योगांना व्यावसायिक उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान हस्तांतरित केले जात आहे. इच्छूकांनी संस्थेच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ऊस पैदास संस्था कोइमतूर यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!