Sugarcane : ऊस कारखानदाऱ्यांकडून भ्रष्टाचार होतोय का? गुजरातमध्ये ऊसाचे उत्पन्न कमी मात्र तरीसुद्धा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी ऊसाची (Sugarcane) लागवड अधिक ठिकाणी पाहायला मिळते. ऊसातून मिळणारे उत्पादन इतर पिकांपेक्षा अधिक आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब या राज्यात ऊस उत्पादन जास्त आहे. यातील गुजरातमधील ऊस उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा नफा हा महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रातील ऊसाचा माल हा कारखान्यापर्यंत पोहचवण्यासाठी लागणारा खर्च यात सर्रास लूट होताना पहायला मिळते. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील कारखानदार गौडबंगाल करत आहेत. गुजरातचे कारखानदार हे प्रामाणिकपणे काम करत असल्याने गुजरातच्या ऊस उत्पादकांना अधिक फायदा मिळतोय.

महाराष्ट्रातील ऊस उत्पादन आणि गौडबंगाल

महाराष्ट्रात अनेक पिके घेतली जातात. त्यातील ऊस हे पीक अधिकाधिक उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन अधिक होते. मात्र महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांहून गुजरातच्या शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. यामुळे महाराष्ट्रातील कारखानदार उत्पादकांपेक्षा स्वतःची तिजोरी भरण्याच्या मार्गावर आहेत. त्याची उत्तम उदाहरणे पुढीलप्रमाणे:

१) महाराष्ट्रातील ऊस उत्पादक तयार झालेली साखर कारखान्यात घेऊन जाताना कारखानदार प्रती टणाला काटा मारून,साखर विकून कोट्यवधी रुपये जमा करतात.

२) कारखानदार शेतकऱ्यांकडून अधिक प्रमाणात साखर लुबाडतात. यामुळे शेतकऱ्यांना नफ्यापासून दूर राहावं लागतं.

३) काही कारखानदार ऊस उत्पादकांकडून कमी दरात साखर विकत घेऊन अधिक दराने विक्री करतात. यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचा तोटा होतो.

४) आवश्यक साहित्य खरेदी करणे, बारदाने विकत घेण्यामागे कारखानदरांचं काहीतरी मोठं गौडबंगाल शिजलं आहे.

५) कायम ठेवी, ठेवी यांसारख्या अनेक बाबींसाठी कारखानदार कपात करतात. हे महाराष्ट्रातील कारखानदारचं गौडबंगाल आहे. यामुळे महाराष्ट्रात ऊस उत्पादनात वाढ झाली असली तरीही कारखानदारी भ्रष्ट नीतीचा अवलंब करत असल्याने महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो. मात्र गुजरातमधील कारखानदारी ही भ्रष्टाचारापासून चार हात लांब आहेत.

गुजरातमधील कारखानदार ईमानदार?

उद्योगधंद्याबाबत गुजरात हे केंद्रस्थानी असलेलं राज्य आहे. अनेक बाजारपेठा गुजरात राज्यात आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय गुजरातमध्ये अधिक पहायला मिळतो. तरीही गुजरातमध्ये ऊस उत्पादन महाराष्ट्रापेक्षा कमी असले तरीही ऊस उत्पादकांच्या तोंडात चांदीचा चमचा आहे. हे फक्त गुजरातमधील कारखानदाऱ्यांमुळे शक्य झालं. त्याची उत्तम उदाहरणे पुढीलप्रमाणे:

१) कारखानदार ऊस उत्पादनात कोणतीही कपात न करता रक्कम दिली जाते. इतर कोणत्याही बाबीवर खर्च केला जात नाही याचा फायदा ऊस उत्पादकांना होतो.

२) अनावश्यक खरेदी, उत्पादन खर्च फारसा नाही. राजकारण न करता मिळालेला नफा शेतकऱ्यांना मिळतो.

३) गुजरातमध्ये माल कारखान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी खेपेला ५ हजारांपर्यंत खर्च होतो. मात्र त्या ठिकाणी साखर उत्पादनातून कारखानदार कोणताही वाटा घेत नाही.

४) गुजरातमध्ये ९० ते १०० टक्के दराप्रमाणे साखर विक्री केली जाते. यामुळे गुजरातमध्ये ऊस उत्पादकांना लाखो रूपये नफा होतो. म्हणून गुजरातला महाराष्ट्रापेक्षा कमी ऊस उत्पादन असले तरीही कारखानदारांच्या इमानदरीची कृपा त्यांच्यावर सदैव आहे.

error: Content is protected !!