Weather Forecast : देशात दुष्काळाचे सावट? यंदा मान्सून कसा असणार? स्कायमेटचा हवामान रिपोर्ट जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Forecast : अमेरिका हवामान खात्याने भारतासह आशिया खंडाच्या हवामान खात्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने (Weather Department) भारतात यंदा दुष्काळ पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे याबाबत आता देशात हवामानाबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जाऊ लागले आहेत.

देशात यंदा अवकाळी पावसाने संकट आहे. याचा विपरीत परिणाम हा शेती क्षेत्रावर होतो आहे. काल (ता.११) या दिवशी स्कायमेट या हवामान खासगी संस्थेने २०२३ या वर्षाची मान्सून हवामान (Mansoon Climate) स्थिती कशी असेल याबाबत भाकीत केलं आहे. यंदाच्या मान्सून हवामानाबाबत पहिला अहवाल जारी केला आहे. यामध्ये यावर्षी भारतात मान्सून कसा राहील याबाबत माहिती देण्यात आली आहे.

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावात कोणत्या दिवशी पाऊस पडणार आहे याची माहिती मिळवणे अतिशय सोपे झाले आहे. Hello Krushi या अँपच्या मदतीने अनेक शेतकरी आपल्या गावातील तसेच जिल्ह्यातील अचूक अवमान अंदाज जाणून घेऊन त्यानुसार पीक नियोजन करत आहेत. यामुळे संभाव्य नुकसान टाळता येतेच पण त्याचसोबत शेतीचे योग्य व्यवस्थापन करण्यास यामुळे मदत होत आहे. तुम्हीसुद्धा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्या.

अल निनो या हवामान प्रणालीमुळे यंदा २० टक्के भारतात दुष्काळ पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. सामान्यपणे पाऊस पडण्याची शक्यता केवळ २५ टक्के आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये ९४ टक्के दीर्घकाल पाऊस पडण्याची संभावना हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. १९९७ या सालात अल निनोने देखील असाच अंदाज वर्तवला होता. मात्र त्यानंतर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता.

याउलट २००४ मध्ये अलनिनो हवामानाची परिस्थिती पाहता या वर्षात देखील दुष्काळ अधिक पहायला मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदा देखील मान्सून हा समाधानकारक राहणार नाही, असा अंदाज स्कायमेटने केला आहे. मात्र यावर भारतीय हवामान विभागाने वेगळे मत मांडले आहे.

शासकीय योजना, शासन निर्णय, बाजारभाव मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

पावसाळ्यात कमी पाऊस पडला तर शेती क्षेत्रावर त्याचा वाईट प्रभाव होऊ शकतो. शेती क्षेत्रावर संकट आले तर त्याचा इतर सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम होऊ शकतो. या कारणामुळे मंदीची चाहूल जाणवेल. याचमुळे आता या स्कायमेटचा अंदाज आता कितपत यशस्वी होईल हे पाहणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!